Covid-19 Goa: कोरोनामुळे दगावलेल्या मृतांच्या नातेवाईकांना सरकारतर्फे 2 लाखांची मदत

Pramod sawant promises.jpg
Pramod sawant promises.jpg

पणजी: कोरोनामुळे (Covid-19) ज्या व्यक्तींचा मृत्यू झाला आहे, त्या व्यक्तींच्या कुटुंबियांना गोवा (Goa) सरकारतर्फे दोन लाख रुपये दिले जाणार आहेत.  त्यात वाढ केलेली नाही. त्याचबरोबर केंद्र सरकारने (Central Government) जी रक्कम जाहीर केली आहे ती रक्कम पात्र कुटुंबाना मिळणार आहे. गोवा सरकार ही रक्कम मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी पर्वरी येथे दिली. (Goa Government provides Rs 2 lakh assistance to relatives affected by corona)

पर्वरी येथे पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. केंद्र सरकारने कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना 4 लाख रुपये देण्याची घोषणा केल्यासंदर्भात विचारले असता मुख्यमंत्री म्हणाले, केंद्र सरकारने जी घोषणा केलेली आहे त्यानुसार त्यांचे जे नियम आहेत त्यानुसार ती रक्कम संबंधीत कुटुंबांना नक्कीच मिळेल. गोवा सरकारने यापूर्वीच जाहीर केल्यानुसार 2 लाख रुपये दिले जाणार आहेत. केंद्र सरकारच्या सर्व योजनांचा लाभ गोव्यातील नागरिकांना देण्यासाठी आपले सरकार कटिबद्ध आहे. फक्त कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबाला मदत निधीच नव्हे तर इतर अनेक योजनांचा लाभ गोवा सरकार मिळवून देत आहे. केंद्र सरकारने जी रक्कम जाहीर केलेली आहे ती कोरोनामुळे मृत्यू झालेल्या मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना नक्कीच मिळेल.

संचारबंदीचा चांगला परिणाम
संचारबंदीमुळे गोव्यातील नव्या कोरोना बाधितांची संख्या घटली असून कोरोनामुळे होणारे मृत्यूचे प्रमाणही कमी होत आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. संचारबंदी वाढवण्याबाबत मुख्यमंत्र्यांना विचारले असता त्यांनी काहीही सांगितले नाही.
गृह आधार, ज्येष्ठांचे अनुदान थकले 
राज्यातील सर्व सामाजिक योजना गोवा सरकारने सुरू ठेवलेल्या आहेत. गृह आधार व दयानंद सामाजिक सुरक्षा योजना या दोन योजनांचे फक्त एका महिन्याचे मानधन थकित आहे. ते लवकरच दिले जाईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. विरोधक चार महिन्यांचे अनुदान थकल्याचे जे आरोप करत आहेत त्यात तथ्य नसून फक्त एका महिन्याचे डीडीएसवाय व गृह आधारचे अनुदान थकल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com