म्हणून गोमंतकियांना कॅसिनोत जाण्यास बंदी...

शुक्र उसगावकर या तरुणाने गोवा खंडपीठात याचिका सादर करून गोमंतकियांना कॅसिनोमध्ये प्रवेशंबदीबाबत सरकारने घेतलेला निर्णय घटनाबह्य तसेच नागरिकाच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणारा आहे.
म्हणून गोमंतकियांना कॅसिनोत जाण्यास बंदी...
Goa Government said Casino access is not fundamental right Dainik Goamntak

पणजी: मांडवी नदीमधील तरंगत्या कसिनोमध्ये (Casino) गोमंतकियांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे, त्याला आव्हान दिलेल्या याचिकेवरील सुनावणी काल सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठासमोर (Goa Court) पूर्ण होऊन त्यावरील निवाडा राखीव ठेवण्यात आला. कॅसिनो प्रवेश हा मूलभूत हक्क होऊ शकत नाही. समाजाच्या हिताच्या दृष्टीने हा प्रवेशबंदीचा निर्णय घेऊ शकते, असा युक्तिवाद सरकारतर्फे ॲडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी केला.

Goa Government said Casino access is not fundamental right
गोवा विमानतळावर वाढतेय प्रवाशांची ‘लाट’!

शुक्र उसगावकर या तरुणाने गोवा खंडपीठात याचिका सादर करून गोमंतकियांना कॅसिनोमध्ये प्रवेशंबदीबाबत सरकारने घेतलेला निर्णय घटनाबह्य तसेच नागरिकाच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणारा आहे. सरकारने हा निर्णय घेऊन घटनेच्या कलम 14चे उल्लंघन केले आहे, असा दावा केला होता. कॅसिनोमध्ये जाण्यास पर्यटकांना प्रवेश आहे मात्र गोमंतकियांना दिला जात नाही. कॅसिनो हे गोमंतकियांसाठी वाईट आहेत, तर पर्यटकांसाठी ते नाहीत का असा सवाल याचिकादार उसगावकर यांनी केला. पर्यटक तसेच गोमंतकीय असा भेदभाव या सरकारने केला आहे. गोमंतकियांना ही बंदी घालून मूलभूत हक्क हिरावला गेला आहे. सगळ्यांना समानतेचा हक्क मिळायला हवा अशी बाजू त्यांनी मांडली.

सरकारने गोमंतकियांच्या हिताच्या दृष्टीने तसेच वाईट प्रवृत्तीपासून दूर ठेवण्यासाठी कॅसिनोमध्ये प्रवेशबंदी केली आहे. हा निर्णय जनहित समोर ठेवून घेतला आहे. त्यामुळे घटनेच्या कलम 14 उल्लंघन झाले आहे असे म्हणता येणार नाही. सरकारने पंचातारांकित व तरंगत्या कॅसिनो जहाजामध्ये ही बंदी लागू केली आहे; मात्र पर्यटक व जहाजामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यातून वगळण्यात आले आहे.

Goa Government said Casino access is not fundamental right
माजी राज्यपाल 'सत्यपाल मलिक' यांची मुख्यमंत्र्यांच्या विरोधात भूमिका

म्हणून कॅसिनोत जाण्यास बंदी...

पर्यटक हे काही दिवसांसाठी गोव्यात मौजमजा करण्यासाठी येतात. त्यांचे हे मनोरंजन क्षणिक असते. मात्र, या उलट गोमंतकियांना प्रवेश दिल्यास ते वारंवार तेथे जातील व त्याच्या परिणाम गोव्यातील समाजावर होऊ शकतो. त्यामुळे या सरकारने कॅसिनोवरील प्रवेशबंदी संदर्भात गोमंतकीय व पर्यटक असे वर्गीकरण केले आहे. समाजाच्या हितासाठी तसेच कल्याणासाठी हा निर्णय आहे. इतर काही राज्यातही स्थानिकांना कॅसिनोमध्ये जाण्यास बंदी आहे, अशी बाजू सरकारतर्फे ॲडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी मांडली.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com