पर्यटन विकासासाठी गोवा सरकारने मागितली केंद्राकडे मदत

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 4 फेब्रुवारी 2021

साथीच्या काळात थांबलेला पर्यटन व्यवसाय थांबला होता.  तेव्हा राज्याचे पर्यटन उद्योग पुन्हा सुरू करण्यासाठी गोवा सरकारने केंद्राकडे आर्थिक मदत मागितली आहे, असे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले.

पणजी: कोविड19 या सर्व जगभर पसरलेल्या रोगाचा परिणाम गोवा पर्यटन व्यवसायावरही झाला. साथीच्या काळात थांबलेला पर्यटन व्यवसाय थांबला होता.  तेव्हा राज्याचे पर्यटन उद्योग पुन्हा सुरू करण्यासाठी गोवा सरकारने केंद्राकडे आर्थिक मदत मागितली आहे, असे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले. बुधवारी पत्रकारांशी बोलताना सावंत म्हणाले की, त्यांनी पर्यटन उद्योगास मदत करण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांना पत्र लिहिले.राज्यातील सर्वाधिक कमाई करणाऱ्याला पर्यटन उद्योगाला मदत करण्याची मागणी या पत्राद्वारे  करण्यात आली.

“आम्हाला माहित आहे की पर्यटन उद्योगावर कोरोना रोगोचा आणि लॉकडाउनचा थेट परिणाम झाला. त्याचे पुनरुज्जीवन करण्यासाठी केंद्राचे सहकार्य गोव्याच्या पर्यटन व्यवसायाला असणे आवश्यक आहे,” असे मुख्यमंत्री म्हणाले. केंद्राकडून किती आर्थिक मदतीची मागणी केली आहे हे त्यांनी अद्याप स्पष्ट केले नाही. सावंत म्हणाले की, खाण उद्योग बंद झाल्याने राज्याच्या महसुलाला आधीच फटका बसला आहे, जो उद्योग राज्यातील प्रमुख आर्थिक स्तंभांपैकी एक होता.

म्हादई प्रश्नावरून शेतकऱ्यांचा  गोवा सरकारला सवाल -

कोविड 19 च्या सावधगिरीचा भाग असलेल्या लॉकडावूनमुळे पर्यटनाचा महसूलही खाली आला आहे. विशेषतः  पर्यटन उद्योग, विदेशी पर्यटन पुनरुज्जीवित करण्यासाठी ही आर्थिक मदत मागितली गेली आहे. की केंद्र सरकार या  मागणीवर नक्की विचार करेल असा विश्वास मुख्यमंत्री सावंत यांनी दर्शविला आहे,

 

संबंधित बातम्या