गोव्यात वर्षाच्या पहिल्याच दिवशी सरकारी बाबूंची उपस्थिती कमी!

दैनिक गोमन्तक
शनिवार, 2 जानेवारी 2021

आंग्ल वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच १ जानेवारीला अनेक सरकारी कार्यालयांतून अपुरा कर्मचारी वर्ग दिसून आला. शुक्रवारी १ तारीख आल्याने शनिवारी व रविवारी सरकारी कार्यालयांना सुट्टी असल्याने त्याचा फायदा घेतला

पणजी: आंग्ल वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच १ जानेवारीला अनेक सरकारी कार्यालयांतून अपुरा कर्मचारी वर्ग दिसून आला. शुक्रवारी १ तारीख आल्याने शनिवारी व रविवारी सरकारी कार्यालयांना सुट्टी असल्याने त्याचा फायदा घेतला आहे. त्यामुळे अनेकांनी शुक्रवारी रजा टाकून तीन दिवसांची सुट्टी एन्जॉय करण्याकडे कल दाखविल्याचे दिसून आले. 

कर्मचाऱ्यांच्या एक दिवसाची सुटी टाकल्याने काही सरकारी कार्यालयांतून निम्म्याहून कमी कर्मचारी कामावर होते. महापालिकेतही असाच प्रकार दिसून आला. अनेक ख्रिश्‍चन समुदायाच्या कर्मचाऱ्यांनी नाताळासाठी आठवड्याची किंवा त्यापेक्षा जास्त दिवसांची रजा टाकली असल्याने त्यांची अनुपस्थिती कार्यालयात दिसत होती. रजेचे अगोदरच नियोजन केले जात असल्याने कर्मचाऱ्यांनी सरत्या वर्षाला निरोप देत आणि नव्या वर्षाचे स्वागत करीत, असा तीन दिवसांचा योग जुळवत सुटीचा आनंद लुटला आहे. 

कर्मचारीच कमी आल्याने पाटो परिसरातील सरकारी कार्यालयासमोरील जागेत वाहनांची संख्याही कमीच दिसून आली. इतरदिवशी पर्यटन खात्याच्या कार्यालयासमोर सकाळी जी गर्दी दिसते, तशी गर्दी आज दिसून आली नाही.

आणखी वाचा:

नववर्षांरंभी गोव्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ‘संजीवनी’ मिळणार -

संबंधित बातम्या