'गोवा सरकारने ई-बाईकसाठीच्या अनुदानाचा तपशील द्यावा'

तेलेकर: बाईकना अर्थसाहाय्य देणारे आप हे पहिले सरकार
Electric Bikes
Electric BikesDainik Gomantak

पणजी: पेट्रोल दरवाढीवरून सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करत सरकारने इलेक्ट्रिक बाइकसाठी आतापर्यंत किती अर्थसाहाय्य (सबसिडी) दिली, हे स्पष्ट करावे, अशी मागणी आम आदमी पार्टीचे उपाध्यक्ष संदेश तेलेकर त्यांनी केली आहे.

इंधन दरवाढीबद्दल नीलेश काब्राल यांना प्रश्न विचारला असता, त्यांनी पत्रकारांना सांगितले होते की, “लोकांनी इलेक्ट्रिक बाईक वापरल्या पाहिजेत”. काब्राल यांचे विधान ‘असंवेदनशील’ असल्याची टीका करत तेलेकर म्हणाले, "काब्राल आमदार असल्याने त्यांचा प्रवासाचा खर्च सरकारी तिजोरीतून भरला जातो.

Electric Bikes
पणजी पालिकेचा 101.67 कोटींचा अर्थसंकल्प सादर, कथित गैरव्यवहार सुरू

यामुळे त्यांना सर्वसामान्यांना होणाऱ्या अडचणींबद्दल काहीच ज्ञान नाही. काब्राल यांनी वक्तव्य करताना सरकार ई बाईकसाठी अनुदान देत असल्याचेही त्यांनी सांगितले होते. त्यामुळे भाजप सरकारने ई- बाईकसाठी आतापर्यंत किती अनुदान दिले आहे ते उघड करावे. दिल्लीतील आप सरकारने ई-बाईकसाठी 60 कोटी रुपयांचे अनुदान आतापर्यंत दिले आहे. शिवाय, इलेक्ट्रिक कार आणि बाईकसाठी अर्थसहाय्य देण्यास सुरवात करणारे आप हे जगातील पहिले सरकार आहे, असेही तेलेकर म्हणाले.

Electric Bikes
गोव्यात ‘आयआयटी’साठी नव्या जागेचा शोध सुरू

धरणांच्या देखभालीत मंत्री असमर्थ: भगत

गल्फ देशांना पाणी निर्यात करण्याबाबत, कृषिमंत्री रवी नाईक यांच्या नुकत्याच केलेल्या विधानावर बोलताना सिद्धेश भगत यांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी यापूर्वीच राज्यात 76 एमएलडी पाण्याची कमतरता असल्याचे सांगितले होते, याची आठवण करून दिली. त्यांचेच मंत्री आता गल्फ देशांना पाणी निर्यात करण्याच्या शक्यतेवर चर्चा करत आहेत. राज्यात आधीच पाच धरणे आहेत, त्यांचीच देखभाल करण्यास मंत्री असमर्थ असताना राज्यभर धरणे बांधण्याचे वक्तव्य नाईक करत आहेत. त्याशिवाय राज्याची जीवनवाहिनी असलेली आपली म्हादई नदी वाचवण्यात देखील सरकार सपशेल अपयशी ठरले आहे, अशी टीका भगत यांनी केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com