राज्य कौशल्य विकासचा `जीआयएम` बरोबर करार

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 19 सप्टेंबर 2020

विश्वजित राणे यांनी दिलेल्या माहितीनुसार,  औद्योगिक उत्पादन आणि सेवा या क्षेत्रातील प्रशिक्षणार्थांना प्रामुख्याने यांतर्गत प्रशिक्षण दिले जाणार आहे. कारागिर प्रशिक्षण योजनेखाली याची अंमलबजावणी केली जाणार आहे.

पणजी: राज्य कौशल्य विकास व उद्योजकता संचालनालय आणि साखळी येथील गोवा इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (जीआयएम) शी यांनी आज एक सामंजस्य  करार केला. यामुळे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रशिक्षण घेणाऱ्या प्रशिक्षार्थींच्या कौशल्यांत विकास करण्यात मदत होणार आहे, अशी माहिती कौशल्य विकास व उद्योजकता खात्याचे मंत्री विश्वजित राणे यांनी दिली. 

राणे यांनी दिलेल्या माहितीनुसार,  औद्योगिक उत्पादन आणि सेवा या क्षेत्रातील प्रशिक्षणार्थांना प्रामुख्याने यांतर्गत प्रशिक्षण दिले जाणार आहे. कारागिर प्रशिक्षण योजनेखाली याची अंमलबजावणी केली जाणार आहे. कौशल्य विकास व उद्योजकता संचालनालय हे गोवा इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटने तयार केलेल्या अभ्यासक्रमाचा आढावा घेईल आणि मान्यता देईल. प्रशिक्षणावरही संचालनालयाची नजर असेल. हे सारे करण्यासाठी एक समिती नेमली जाईल तीची महिन्यातून एकदा बैठक होईल. ती समिती प्रगतीचा आढावा घेईलच आणि देखरेखही करेल. अंमलबजावणीत येणाऱ्या अडचणींचे निराकारणही ही समिती करणार आहे. प्रशिक्षणार्थींचा कौशल्य विकास करण्यास मदत केल्याबद्दल सरकार गोवा इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट संस्थेचे ऋणी आहे.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या