गोवा सरकार सोडविणार पेयजलाची समस्या

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 9 फेब्रुवारी 2021

येत्या महिनाभरात पर्वरी येथील जलशुद्धीकरण प्रकल्प कार्यान्वित केला जाईल अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज येथे पर्वरी दिली.

पणजी : येत्या महिनाभरात पर्वरी येथील जलशुद्धीकरण प्रकल्प कार्यान्वित केला जाईल अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज येथे पर्वरी दिली. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या आरोग्य अभियांत्रिकी विभागाची बैठक मुख्यमंत्र्यांनी आज घेतली आणि राज्यातील पाणीपुरवठ्याचा आढावा घेतला या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी सांगितले, की राज्यभरात दररोज 589 दशलक्ष लिटर पेयजलाची आवश्यकता असते आणि 513 दशलक्ष लिटर पेजल पुरवले जाते.

गोव्यातील बारा आमदार अपात्रता प्रकरणी उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी -

सुमारे 76 दशलक्ष लिटर दुधाची कमतरता राज्याला भासत आहे. विशेषतः बार्देश तालुक्याला व्यवस्थितपणे मिळत नाही यासाठी येथे 31 मार्चपर्यंत दहा दशलक्ष लिटर पेयजल बार्देश अतिरिक्त पुरवण्याची व्यवस्था केली जात आहे.यासाठी पर्वरी येथील पाच दशलक्ष लिटर क्षमतेचा जलशुद्धीकरण प्रकल्प सुरू केला जाणार आहे. याशिवाय शिवोली आणि साळगाव येथे एका कूपनलिकांना जलशुद्धीकरण यंत्र बसवून ते पाणी हि पेयजल म्हणून पुरवले जाणार आहे. बंद असलेल्या खाणीत पाणी साठून आहे. त्या पाण्याचा वापरही शुद्धीकरणानंतर पेयजल म्हणून करता येणार आहे. अशा पद्धतीने आणखी दहा दशलक्ष लिटर पाणी मिळविण्याचा प्रयत्न राहणार आहे. एप्रिल पर्यंत राज्यभरातील पेयजलाची समस्या सरकार सोडवणार आहे.

पणजी नगरपालिका निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आरक्षण जाहीर -

संबंधित बातम्या