‘आयआयटी’ जागा निश्‍चितीसाठी गोवा सरकारची आता सावध भूमिका

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 28 फेब्रुवारी 2021

शेळ-मेळावली येथे आयआयटी संकुलाच्या विरोधात जनउद्रेक झाल्यानंतर सरकारने सावध भूमिका घेतली आहे.

पणजी : शेळ-मेळावली येथे आयआयटी संकुलाच्या विरोधात जनउद्रेक झाल्यानंतर सरकारने सावध भूमिका घेतली आहे. ‘आयआयटी’साठी जागा निश्चिती करताना तेथे त्याविरोधात कोणीही आंदोलन करणार नाही याची दक्षता घ्या, जागेच्या शोधावरून सरकार खो-खो खेळू इच्छीत नाही अशी स्पष्ट सूचना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे. त्यांनी सांगितले, आयआयटीसाठी जागा निश्चित केली पाहिजे. गोव्यात आयआयटी नव्याने येत नाही. फर्मागुढी येथे आयआयटीचे संकुल हंगामी तत्त्वावर आहे. त्यांना कायम संकुल उभारायचे आहे. सत्तरीत आयआयटी तेथील लोकप्रतिनिधीच्‍या मागणीवरून नेण्यात आली होती पुढे लोक त्या प्रकल्पाच्याविरोधात गेले.

बिहारच्या पाटण्यात उभं राहतंय नवं ‘गोवा’ शहर!

जनमताचा आदर करत सत्तरी तालुक्याबाहेर तो प्रकल्प नेण्याचा निर्णय सरकारने घेतला. आयआयटी आपल्या भागात आणावी अशी मागणी अनेकांनी केली आहे. कुडचडे परीसरात हा प्रकल्प आणावा अशी वीजमंत्री नीलेश काब्राल यांनी जाहीर मागणी केली आहे. सुरवातीला लोलये काणकोण येथील भगवती पठाराची पाहणी झाली होती नंतर सांग्यातील जागा सुचवल्या गेल्या होत्या. सत्तरीत त्यानंतर हा प्रकल्‍प करण्याचा प्रयत्न झाला. आता सांगे, कुडचडे, केपे परिसरात जागा सुचवू असे सांगण्यात येत आहे. जनतेला त्या भागात प्रकल्प हवा का हे आधी तपासा असे मी सांगितले आहे. जनतेवर प्रकल्प लादू नये अशी भूमिका त्यामागे आहे असे त्यांनी स्पष्ट केले.

‘मगो’च्या परिवर्तन यात्राने गोवा विधानसभा निवडणूक प्रचाराचा श्रीगणेशा

संबंधित बातम्या