'गोव्यात औषधी वापरासाठी गांजाची लागवड करण्यास अजून परवानगी दिलेली नाही'

The Goa government thinking to introduce a bill to permit cannabis for medicinal purpose but C M Dr Pramod Sawant said it bis not approved yet
The Goa government thinking to introduce a bill to permit cannabis for medicinal purpose but C M Dr Pramod Sawant said it bis not approved yet

पणजी :  गोव्यात औषधी वापरासाठी गांजाची लागवड करण्यासाठी सरकारने कोणालाही परवानगी दिलेली नाही. तशी परवानगी मागितली, म्हणजे ती दिली असं होत नाही, असं मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केलं. गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष, आमदार विजय सरदेसाई यांनी अशा परवानगीसाठी फाईल फिरु लागल्याचा आरोप काल केला होता. त्याबाबत मुख्यमंत्र्यांना आज विचारले असता त्यांनी सांगितले, की फाईल फिरली याचा अर्थ परवानगी दिली असा होत नाही. सरकारने अद्याप तशी कोणतीही परवानगी दिलेली नाही.

दरम्यान, केंद्रीय आयुष मंत्रालयाने तसापरवा प्रस्ताव सादर केल्याची चर्चा आहे. मात्र आपणास त्याबाबत काही माहिती नाही, असे केंद्रीय आयुष राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी याआधीच स्पष्ट केले आहे.चरस, गांजा आणि हॅश हे सगळे ड्रग्स एकाच 'कॅनबीस' नावाच्या वनस्पतीपासून बनवलेले जातात. फक्त यामध्ये ड्रग च्या प्रकारानुसार या कॅनबीस च्या वेगवेगळ्या भागांचा वापर केला जातो. कॅनबस मध्ये काही औषधी गुण असल्यामुळे काही औषधांमध्ये या वनस्पतीचा वापर केला जातो, पण त्यासाठी कायदेशीर परवानगी घेण्याची गरज असते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com