गोमंतकीय तरुण-तरुणींना गोवा सरकारकडून मुख्यमंत्री पाठ्यवृत्ती योजनेची भेट; असे असणार मासिक वेतन

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 23 मार्च 2021

गोवा सरकारने आज मुख्यमंत्री पाठ्यवृत्ती योजनेची घोषणा केली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी या योजनेची घोषणा केली आहे. 

पणजी: गोवा सरकारने आज मुख्यमंत्री पाठ्यवृत्ती योजनेची घोषणा केली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी या योजनेची घोषणा केली आहे. 

या योजनेनुसार पदवीधर झालेल्या तरुण-तरुणींना मंत्र्यांच्या कार्यालयात आणि विविध खात्यांमध्ये पाठ्यवृत्ती वर काम करून कामाचा अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे. विविध श्रेणीनुसार मासिक 10 ते 30 हजार रुपयांचे पाठ्यवेतन या तरुण-तरुणींना सरकार देणार आहे. गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये या योजनेची घोषणा करण्यात आली होती. आता राज्याचा अर्थसंकल्प उद्या मांडण्यात येणार आहे तत्पूर्वी या योजनेची कार्यवाही करण्याची तत्परता सरकारने दाखवलेली आहे. 

पणजी बाजारात हापूस व मानकुरात आंब्याचा घमघमाट 

राज्य सरकारने कला अकादमीच्या वास्तूचे नूतनीकरण करण्याचे ठरवले आहे. या इमारतीच्या मूळ आराखड्याला आणि रचनेला कोणताही धक्का न लावता हे काम 50 कोटी रुपये खर्चून सरकार करणार आहे. इमारत अधिक सक्षम आणि आकर्षक करण्यासाठी हे काम केले जाणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय आज घेण्यात आला आहे. 

गोवा मुक्ती संग्रामाचे प्रणेते राम मनोहर लोहिया यांना मानवंदना 

दरम्यान कोरोनाचे रुग्ण गोव्यात वाढत चालले असतानाच राज्याबाहेरून येणाऱ्यांना कोरोना नकारात्मक प्रमाणपत्राची सक्ती करता येणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. ते म्हणाले कोरोनाचे रुग्ण वाढत राहिले तर शिमगोत्सव आयोजनाचा फेरविचार करावा लागणार आहे.

वाहतूक मंत्री गुदिन्हो यांच्या हस्ते विंटेज कार रॅलीचे उद्‌घाटन 

संबंधित बातम्या