वास्को रेल्वेस्थानकावर आरोग्यतपासणी होणार

दैनिक गोमन्तक
गुरुवार, 3 डिसेंबर 2020

गोव्याबाहेरून वास्को रेल्वे स्थानकावर येणाऱ्या प्रवाशी गाड्यांतील प्रवाशांची मार्गदर्शक तत्वानुसार आरोग्य तपासणी होणार असल्याचे वास्को रेल्वे स्थानकाचे प्रमुख अधिकारी रामदास गुडमाने यांनी सांगितले. 

दाबोळी: गोव्याबाहेरून वास्को रेल्वे स्थानकावर येणाऱ्या प्रवाशी गाड्यांतील प्रवाशांची मार्गदर्शक तत्वानुसार आरोग्य तपासणी होणार असल्याचे वास्को रेल्वे स्थानकाचे प्रमुख अधिकारी रामदास गुडमाने यांनी सांगितले. 

कोविडच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर गोवा सरकार सतर्क झाले आहे. त्यामुळे गोव्याबाहेरून येणाऱ्यांची तपासणी करण्यास आरंभ झाला आहे. वास्को रेल्वे स्थानकावर गुरुवारी दिल्लीहून गोवा एक्स्प्रेस व विशाखापट्टण येथून प्रवाशी गाड्या येणार आहेत. 

दोन्ही रेलगाड्या सकाळी सहा ते साडेसहाच्या दरम्यान वास्को रेल्वे स्थानकावर येतील. या गाड्यातील प्रवाशी स्थानकाबाहेर पडण्यापूर्वी त्यांची तपासणी करण्यात येणार आहे. गोव्याबाहेरून या रेल्वे स्थानकावर दररोज सरासरी १५० आसपास प्रवाशी येतात. त्यांची तपासणी करण्याचे काम राज्य प्रशासकीय पथकामार्फत करण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व तयारी बुधवारी करण्यात आली असल्याचे गुडमाने यांनी स्पष्ट केले. 

संबंधित बातम्या