
पणजी : उत्तर गोव्यात होऊ घातलेल्या मोपा विमानतळामुळे सुमारे 54 हजार झाडांची तोड करण्यात आली आहे. याबाबत मंत्री विश्वजीत राणेंना नुकतेच गोमन्तकने बोलतं केलं. राणेंना झाडांच्या कत्तलीबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी मोपा विमानतळासाठी तोडल्या गेलेल्या झाडांपेक्षा जास्त झाडं लावली जाणार असल्याचं सांगितलं आहे.
मोपा विमानतळ हा केंद्र आणि राज्य सरकारचा अत्यंत महत्त्वाकांक्षी मोठा प्रकल्प आहे. हे विमानतळ झाल्यावर गोव्याच्या अर्थकारणात भर पडणार आहे. यामुळे पर्यटन आणि कार्गो उद्योगाला चालना मिळेल व रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. त्यामुळे काही बाबतीत आपल्याला तडजोडीची भूमिका घ्यावी लागते. इतक्या मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाली असली तरी आपण नव्याने झाडे लावू शकतो. हे काम खासगी लोकांना देण्यापेक्षा वन विभागाकडे दिल्यास वन विभाग या सर्व गोष्टींचा पाठपुरावा करेल. अन्यथा खासगी संस्था झाडे लावतील आणि त्यांचे पुढील संवर्धनाचं काम होणार नाही, असं वनमंत्री विश्वजीत राणे यांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान कोविडच्या काळात सरकारने राज्यातील जनतेला अत्यंत चांगल्या सुविधा देण्यासाठी प्रयत्न केला जे इतर राज्यांना शक्य झाले नाही, ते आम्ही केले. मात्र, अलीकडच्या काळात कर्करोग मोठ्याने वाढ वाढताना दिसत आहे. कर्करोगाला रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायांसाठी लवकर निदान होणे अत्यंत महत्त्वाचे असते. योग्य वेळी योग्य उपचार घेतले नाही तर त्याचा परिणाम भयानक होतो. त्यासाठी कर्करोगावरील अत्याधुनिक सुविधा मिळाव्यात यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत, असं विश्वजीत राणे यांनी स्पष्ट केलं आहे.
मुंबईचे अमित मायदेव यांच्यासारखे वरिष्ठ कर्करोग तज्ज्ञांना राज्यात बोलून त्यांच्या अनुभवाचा जनतेला फायदा करून देण्यासाठी प्रयत्न करत आहे. जनतेला कर्करोगावरील निदान आणि उपचाराच्या सुविधा मिळतील असेही या मुलाखतीत राणे यांनी सांगितले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.