सर्व रूग्णांना गृह अलगीकरण संच उपलब्ध करून दिले जातील- आरोग्यमंत्री राणे

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 13 ऑक्टोबर 2020

गेल्या काही दिवसांपासून  ३०० च्या खाली गेलेल्या मडगाव व पर्वरी आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात पुन्हा रुग्ण वाढले आहेत. आज ही संख्या ३००च्या वर गेली असल्याचे दिसून येते. दरम्यान, मागील २४ तासांत ४ जण दगावल्याने आत्तापर्यंत कोरोनामुळे बळी गेलेल्यांची संख्या ५११ झाली आहे.

पणजी- राज्य सरकारने जाहीर केल्यानुसार गृह अलगीकरणात असलेल्या ५ हजार रुग्णांना गृह अलगीकरण संचचे वितरण एका आठवड्यात केले जाईल. या रुग्णाला आरोग्य केंद्राचा अधिकारी संच देताना सर्व माहिती देईल. त्याचबरोबर त्या रुग्णाची दररोजची माहिती नोंद करण्याचे काम तो अधिकारी करेल.

या रुग्णांचे सीटी स्कॅन आणि एक्स-रे घेण्यासाठी एक पद्धत निर्माण केली जाईल. गंभीर रूग्ण, वृद्ध किंवा सहकारी रुग्णांवर उपचार सुरू करण्यापूर्वी त्यांचे सीटी स्कॅन आणि एक्स-रे काढले जावेत, असे आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी आजच्या आढावा बैठकीत सांगितले.

गेल्या काही दिवसांपासून  ३०० च्या खाली गेलेल्या मडगाव व पर्वरी आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात पुन्हा रुग्ण वाढले आहेत. आज ही संख्या ३००च्या वर गेली असल्याचे दिसून येते. दरम्यान, मागील २४ तासांत ४ जण दगावल्याने आत्तापर्यंत कोरोनामुळे बळी गेलेल्यांची संख्या ५११ झाली आहे.

राज्यात दक्षिण गोव्यात मडगाव, तर उत्तर गोव्यातील पर्वरी आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात कमी-जास्त रुग्ण होत असल्याचे दिसून येते. पर्वरी आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात शनिवारी २७८, रविवारी २९८ रुग्णसंख्या होती. ती वाढून आज ३०६ झाली आहे. तर मडगाव आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात शनिवारी ३१५, तर रविवारी  २९७ रुग्णसंख्या होती. आज ३१३ वर येथील रुग्णसंख्या पोहोचली आहे. आज १४४२ जणांचे नमुणे तपासणीसाठी घेण्यात आले. ३०८ जण पॉझिटिव्ह आढळले, २६२ जणांना घरगुती विलगीकरणात राहण्यास मंजुरी मिळाली आहे. ६७ जणांना रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले आहे. ४९५ जणांना प्रकृती सुधारल्याने मागील २४ तासांत घरी सोडण्यात आले. अॅक्टिव पॉझिटिव्ह  ४ हजार ४६५ रुग्ण आहेत. 

मागील २४ तासांत मृत्यू झालेल्यांत थिवी येथील ७५ वर्षीय पुरुष, सांगे येथील ६३ व ८१ वर्षीय पुरुष आणि कुडचडे येथील ६७ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

संबंधित बातम्या