गोव्यात लवकरच मोटार वाहन कायदा लागू

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 6 फेब्रुवारी 2021

वाहतूकमंत्री श्री माविन गुदिन्हो यांनी पर्वरीतील सचिवालयात आयोजित केलेल्या कार्यक्रमात सडक अपगातग्रस्त आणि त्यांच्या कुटुंब सदस्यांना गोवा राज्य अंतरिम नुकसान भरपाई योजनेखाली सुमारे २४  मंजुरी पत्रे वितरित केली.

पणजी: वाहतूकमंत्री श्री माविन गुदिन्हो यांनी पर्वरीतील सचिवालयात आयोजित केलेल्या कार्यक्रमात सडक अपगातग्रस्त आणि त्यांच्या कुटुंब सदस्यांना गोवा राज्य अंतरिम नुकसान भरपाई योजनेखाली सुमारे २४  मंजुरी पत्रे वितरित केली. रस्ते अपघातग्रस्तांना विम्याच्या लाभाबरोबरच आर्थिक मदत उपलब्ध करणे हा या वाहतूक खात्याच्या योजनेचा उद्देश आहे.

वाहतूकमंत्री श्री गुदिन्हो यानी सरकार लवकरच मोटार वाहन कायदा अमलात आणणार असल्याचे सांगितले आणि राज्यात अपघात कमी करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. श्री माविन गुदिन्हो यांनी जनतेला दंड लावण्यासाठी राज्य सरकार तसेच केंद्र सरकारचा कोणताही हेतू नसल्याचे सांगितले. जर लोकांनी वाहतुकीचे नियम पाळले तर कोणताही दंड आकारला जाणार नाही असे ते म्हणाले आणि पालकांना आपल्या अल्पवयीन मुलांना वाहन न देण्याचे आवाहन केले. ते परवाना घेतल्यानंतरच वाहन चालवू शकतात. लोकांनी 'कायदा मोडू नका'  या मंत्राचे पालन करावे असेही त्यांनी सांगितले.

गोवा सरकार सर्वसामान्यांवर दरवाढ लादली -

या योजनेबद्दल अधिक जागरूकता निर्माण करण्याची गरज व्यक्त करून  श्री गुदिन्हो यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी बहुतांश लोक अद्याप या योजनेबद्दल अनभिज्ञ असल्याचे सांगून या योजनेहद्दल जागृती निर्माण करण्याची गरज व्यक्त केली. लोकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. श्री. गुदिन्हो यांनी अपघातग्रस्तांच्या कुटूंबाना एकूण २४ मंजुरी पत्रे वितरित केली. मृत्यू झाल्यास या योजनेखाली रू. २ लाख आर्थिक मदत देण्यात येते. एखाद्या गंभीर इजा झाल्यास १.५० लाख रुपये, अपघातानंतर लगेचच रुग्णालयात भरतीसाठी  ६० दिवसांसाठी  रू. एक लाख . कमी गंभीर दुखापत झाल्यास ५० हजार रुपयांची मदत आणि ३ ते ७ दिवसांच्या हॉस्पिटलायझेशनसाठी १० हजारांची मदत दिली जाते. वाहतूक खात्याचे संचालक श्री. राजन सातार्डेकर, लेखा अधिकारी व छाननी समितीचे सदस्य श्री. सुब्रज काणेकर यावेळी उपस्थित होते.

गोव्यातील कार्निव्हल रद्द करण्याची मागणी -

संबंधित बातम्या