गोव्यात राज्यपाल व राज्य निवडणूक आयोग पूर्णवेळ नेमा - विजय सरदेसाई 

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 3 मार्च 2021

गोव्याचे राज्यपाल अर्धवेळ आहे, महाराष्ट्राच्या राज्यपालांकडे गोव्याचा ताबा सोपवण्यात आला आहे.

मडगाव : राज्य निवडणूक आयोग व राज्यपाल ही दोन्ही पदे घटनात्मकदृष्ट्या महत्वाची असून या दोन्ही पदांवर पूर्णवेळ नेमणूक करावी अशी मागणी गोवा फाॅरवर्डचे अध्यक्ष व फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी येथे पत्रकार परिषदेत केली. 

राज्य निवडणूक आयोग चोखा राम गर्ग हे पालिका निवडणुकीत गोंधळ माजवलेल्या सरकारचे नोकरशहा असणे हा प्रकार घटनेची पायमल्ली करणारा आहे. ते राज्याचे कायदा सचिव आहेत. गांजा शेतीच्या प्रस्तावाला त्यांनी मंजुरी दिली होती. पालिका निवडणूक प्रक्रियेत गर्ग यांनी निपक्षपतीपणाचा समझोता केला असून त्यांनी घटनेचे उल्लंघन केले आहे. अशा व्यक्तिला राज्य निवडणूक आयोग पदावरून हटवण्यात यावे अशी मागणी सरदेसाई यांनी केली.

गोव्याचा कुख्यात गॅंगस्टर अन्वर शेख हल्लाप्रकरणातील मुख्य आरोपी अद्यापही फरार

राज्य निवडणूक आयोग ह महत्वाचे घटनात्मक पद आहे. या पदावरच्या व्यक्तिच्या हातून चुकीचा प्रकार घडल्यास राज्याचे घटनात्मक प्रमुख या नात्याने राज्यपालांकडे दाद मागायची असते. पण, गोव्याचे राज्यपाल अर्धवेळ आहे. महाराष्ट्राच्या राज्यपालांकडे गोव्याचा ताबा सोपवण्यात आला आहे. त्यांचे वास्तव्य मंबईत असते. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाकडून लोकशाही हत्या झाल्यानंतर दाद कुठे मागायची हा प्रश्न उपस्थित होतो. याची दखल घेऊन  केंद्रीय गृहमंत्र्यांनी गोव्यासाठी पूर्णवेळ राज्यपाल नेमावा अशी मागणी सरदेसाई यांनी केली. 

पालिका निवडणुकीच्या राखीवतेत घोळ केलेल्या भाजप सरकारकडून लोकशाहीचा पूर्वनियोजित खून झाला असताना लोकशाहीच्या रक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयात आव्हान याचिका असे मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यांनी केलेले वक्तव्य धाडसाचे आहे, असे मत सरदेसाई यांनी व्यक्त केले. 
 

संबंधित बातम्या