राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी गोव्यातील कोविड परिस्थितीचा आढावा घेतला

गोमंन्तक वृत्तसेवा
शनिवार, 15 मे 2021

महाराष्ट्र आणि गोव्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासमवेत कोरोना परिस्थितीविषयी बैठक घेतली. या बैठकीत गोवाचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते.

पणजी: महाराष्ट्र आणि गोव्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासमवेत कोरोना परिस्थितीविषयी बैठक घेतली. या बैठकीत गोवाचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते. दोन्ही नेत्यांनी राज्यपालांना गोव्यातील वास्तविक परिस्थितीची जाणीव करुन दिली.

गोव्यात कोरोना साथीच्या आजारामुळे गोष्टी अधिकच वाईट होत आहेत. गोवा मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये अजूनही कोविड रुग्णांच्या मृत्यूची संख्या थांबलेली नाही. काल  शुक्रवारीही ऑक्सिजनअभावी 13 रुग्णांचा मृत्यू झाला. राज्याच्या महाधिवक्ता यांनी ही माहिती मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाला दिली आहे. बुधवारी राज्यात 20 आणि मंगळवारी 26 ऑक्सिजनच्या संकटामुळे 26 रुग्णांचा मृत्यू झाला. गोवा खंडपीठ ऑक्सिजन विषयाशी संबंधित अनेक याचिकांवर सुनावणी करत आहे. कोविड रुग्णांना रुग्णालयात ऑक्सिजन उपलब्ध करण्याचे आदेश कोर्टाने दिले होते. गोव्याला ऑक्सिजनचा कोटा लवकरात लवकर उपलब्ध होईल याची काळजी केंद्राने घ्यावी असे हायकोर्टाने म्हटले होते.

गेल वादळ आज गोव्यात धडकण्याची शक्यता 

गोव्यात शुक्रवारी कोरोनाचे 2455 नवीन रुग्ण आढळले आहेत. तथापि, नव्याने संसर्ग झालेल्या लोकांच्या संख्येपेक्षा बरे होण्यासाठी लोकांची संख्या जास्त आहे. शुक्रवारी साथीच्या  या आजारातून 2960 लोक सावरले. तर 24 तासांत 61 लोकांनी आपले प्राण गमावले आहे.

18 ते 44 वयोगटासाठी आजपासून लसीकरण 
केंद्र सरकारने गोव्यासाठी 18 ते 44 या वयोगटातील नागरिकांसाठी 32,870 कोविशिल्ड डोस पाठवले आहेत. त्यामुळे लसीकरण आजपासून विविध आरोग्य केंद्रावर सुरू होणार आहे. प्रत्येक आरोग्य केंद्रासाठी 110 डोस देण्यात आले असून ज्यांनी नोंदणी केली आहे त्यांनाच ते दिले जातील. प्रत्येकाला लसीकरणासाठीचा दिवस संदेश पाठवून दिला जाणार आहे त्याच दिवशी व वेळी जाऊन डोस घ्यावा व गर्दी करू नये, असे आवाहन डॉ. राजेंद्र बोरकर यांनी केले आहे.  

गोमेकॉत अनेकांचे जीव गेल्यानंतर सरकारला आता आली जाग 

1.91 कोटी कोविड लसींचे राज्यांना लवकरच वितरण   
केंद्र सरकारकडून राज्य तसेच केंद्रशासित प्रदेशांना येत्या १५ दिवसांत सुमारे 1.91 कोटींचे कोविड लसीचे डोस मोफत देण्यात येणार आहेत. यामध्ये कोविशिल्डच्या 162.5 लाख, तर कोविक्सिनच्या 29.59 लाख लसींचा समावेश आहे. गोव्यात आजपासून 18 ते 44 या वयोगटातील नागरिकांना लसीकरण करण्याची मोहीम सुरू झाली आहे. यापूर्वी केंद्राने राज्यांना 1.7 कोटी लसीचे मोफत वितरण केले होते. 
 

संबंधित बातम्या