राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांना राखी बांधताना बलराम निवासी शाळेच्या शिक्षिका बाजूला रमेश तवडकर व अनंत जोशी.
राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांना राखी बांधताना बलराम निवासी शाळेच्या शिक्षिका बाजूला रमेश तवडकर व अनंत जोशी.Dainik Gomantak

Goa: सीमारेषेवरवरील सैनिकांना राखी बांधणार राज्यपाल राजेंद्र आर्लेकर

हिमाचल प्रदेशातील चीनच्या सीमारेषेवरील भारतीय सैनिकांना काणकोण मधून 'एक राखी सैनिकांसाठी' कार्यक्रमातून दिलेल्या राखी प्रत्यक्ष सैनिकांना आपल्या हाताने बांधणार आहे.

काणकोण: 'एक राखी सैनिकांसाठी' (Ek Rakhi sainikasathi) हा उपक्रम गेली सात वर्षे राज्यात राबविण्यात आला आहे. आता राज्यातील रहिवाशांच्या आशिर्वादाने हिमाचल प्रदेशाचा राज्यपाल होण्याचा मान मिळाला आहे. हिमाचल प्रदेशाला चीनची सीमा (China border) लागून आहे. या सीमा रेषेवर भारतीय जवान डोळ्यात तेल घालून देशाचे रक्षण करीत आहेत.

22 ऑगस्टला शिमल्याला परत जाणार आहे. 26 किंवा 27 ऑगस्टला हिमाचल प्रदेशातील चीनच्या सीमारेषेवरील भारतीय सैनिकांना काणकोण मधून 'एक राखी सैनिकांसाठी' कार्यक्रमातून दिलेल्या राखी प्रत्यक्ष सैनिकांना आपल्या हाताने बांधणार आहे. हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी आमोणे-पैगीण येथे बलराम निवासी शाळेने आयोजित केलेल्या एक राखी सैनिकांसाठी या कार्यक्रमात ते बोलत होते.

राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांना राखी बांधताना बलराम निवासी शाळेच्या शिक्षिका बाजूला रमेश तवडकर व अनंत जोशी.
Goa Police: चंद्रकांत बांदेकर हत्या प्रकरणात एकाला गुजरातमधून अटक

यावेळी निवृत्त सैन्य दलाचे अधिकारी अनंत जोशी, माजी मत्री रमेश तवडकर, श्रीस्थळ पंचायतीचे सरपंच दत्ता गावकर माजी सरपंच गणेश गावकर बलराम निवासी शाळेच्या मुख्याध्यापिका सविता तवडकर उपस्थित होत्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com