Goa Government: 'कर्जे काढून इव्हेंट करणाऱ्या सरकारकडे प्रजासत्ताकदिनासाठी पैसे नाहीत'

सरकारकडे प्रजासत्ताकदिन साजरा करण्यासाठी पैसे नाहीत. म्हणूनच ते कर्मचाऱ्यांकडून पैसे वसूल करत आहे.असा आरोप काँग्रेसने केला.
Money |Goa Government
Money |Goa GovernmentDainik Gomantak

हजारो कोटींची कर्जे घेऊन सरकारच्या आणि पक्षाच्या कार्यक्रमांचा इव्हेंट करणाऱ्या सरकारकडे प्रजासत्ताकदिन साजरा करण्यासाठी पैसे नाहीत. म्हणूनच ते जिल्हाधिकाऱ्यांसारख्या प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून नोटीस काढून कर्मचाऱ्यांकडून पैसे वसूल करत आहे. (Goa Government on Republic Day 2023)

असा आरोप करत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांवर त्‍वरित कारवाई करा, अन्यथा न्यायालयात जाणार, असा इशारा काँग्रेसचे आमदार कार्लुस फेरेरा यांनी दिला.

दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकारी ज्योती कुमारी यांनी नोटीस काढून 26 जानेवारीला प्रजासत्ताकदिन मोठ्या प्रमाणात साजरा करण्यासाठी सर्व कायमस्वरूपी वरिष्ठ शासकीय अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना आपल्या पगारातून प्रत्येकी 1 हजार रुपये जमा करण्याचा आदेश दिला आहे.

Money |Goa Government
Republic Day: कथा सक्तीच्या वर्गणीची

यावरून काँग्रेस आमदार फेरेरा यांनी सरकारवर टीकास्र सोडले. हे पैसे कोणत्या स्वरूपात जमा करणार? त्याची पावती कोण देणार? पैसे कोणत्या अकाऊंटमध्ये जमा करणार? त्या पैशाचा वापर कसा करणार? कोणत्या संस्थांना यातील पैसे किंवा कामे देणार?

त्या निवडीचे निकष काय? आणि पैसे शिल्लक राहिले तर ते कुठे जमा करणार? असा प्रश्नांचा भडीमार त्‍यांनी केला. तसेच हे प्रशासकीय अधिकाऱ्याचे काम नसून ते तातडीने बंद करावे आणि संबंधित जिल्हाधिकाऱ्यांची अन्यत्र बदली करावी व इतर कारवाई करावी अशी मागणीही फेरेरा यांनी केली.

महसूलमंत्र्यांची वेगवेगळी विधाने

राष्ट्रीय सण साजरे करण्यासाठी कर्मचाऱ्यांकडून नोटीस काढून सक्तीचे पैसे वसूल करता येत नाहीत व तशा प्रकारची नोटीसही काढता येत नाही. त्यामुळे ही नोटीस नेमकी का आणि कशासाठी काढली, याबाबत स्पष्टीकरण मागविले आहे.

ते आल्यानंतर कारवाई केली जाईल, असे महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी बुधवारी सकाळी सांगितले.

तर, संध्याकाळी ते म्‍हणाले की, कर्मचाऱ्यांकडून जमा केलेले पैसे हे चॅरिटीसाठी म्‍हणजेच वृद्धाश्रम, अनाथाश्रम, विशेष-दिव्यांग व्यक्ती, एड्सबाधित रुग्णांसाठी वापरण्यात येणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com