Goa Mining: खाणकाम लिलाव होणार आणखी सुलभ

राज्य सरकारने खाणकाम प्रक्रियेसाठी केली संयुक्त कार्यकारी गटाची स्थापना
Goa Mining
Goa MiningDainik Gomantak

खाणकाम पुन्हा सुरू करण्यासाठी राज्यातील खनिज ब्लॉक्सचा लिलाव सुलभ करण्यासाठी, राज्य सरकारने मंगळवारी ब्लॉक्सच्या तयारीशी संबंधित तांत्रिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि लिलाव सुरळीत पार पाडण्यासाठी एक संयुक्त कार्य गट (JWG) स्थापन केला.

(Goa govt sets up joint working group on mining)

Goa Mining
Goa Update| खरी कुजबूज! बाप्पा, पाव रे पोलिसांना...

हा कार्यगट लिलाव प्रक्रियेत सामील असलेल्या विविध एजन्सींच्या क्रिया - प्रक्रियाकरता समन्वय साधेल. तसेच यापूर्वी लिलाव झालेल्या ब्लॉक्सच्या अधिक सक्रिय होण्याकडे लक्ष देईल. तसेच प्रत्येक दोन महिन्यांनी एकदा बैठका घेत प्रक्रियेचे पुनर्वालोकन करणे आणि प्रत्येक बैठकीनंतर ते केंद्रीय खाण मंत्रालयास याबाबतचा अहवाल सादर करेल, असे एका वरिष्ठ सरकारी सूत्राने स्पष्ट केले आहे.

Goa Mining
Goa Zuari Bridge| नोव्हेंबरपर्यंत ‘झुआरी’वरून चौपदरी वाहतूक होणार सुरू

प्रक्रियेला अधिक सुलभ होण्यासाठी राज्य सरकारने घेतला निर्णय

खाण लिलाव प्रकरणावरुन राज्यात आरोप - प्रत्यारोप झाले आहेत. सध्या 150 च्या वर खाणी सरकारच्या मालकीच्या आहेत. यासाठी केंद्रीय खनिज मंडळाच्या सहकार्याने त्याची गुणवत्ता आणि व्याप्ती तपासली जात आहे.

टप्प्याटप्प्याने खाणींचा लिलाव केला जाणार आहे. या प्रक्रियेला अधिक - अधिक सुलभ करण्यासाठी वेगवेगळे पर्याय अवलंबण्याचा विचार राज्यशासनाच्या विचाराधिन आहे. याचाच एक भाग म्हणून राज्य सरकारने खाणकामावर संयुक्त कार्यकारी गटाची केली स्थापना केली आहे.

हा गट लिलावप्रक्रिया अधिक सुलभ होण्यासाठी उपयोगी पडणार आहे. कारण लिलाव प्रक्रियेचे क्षेत्रानुसार विभाग गृहीत धरले जाऊन यावर प्रक्रिया केली जाणार आहे. त्यामूळे नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार अशा प्रकारे खाण लिलाव प्रक्रिया राबवली जाणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com