गोवा राज्यसरकारची मोठी घोषणा: राज्यातील नागरिकांना मिळणार फ्री कोरोना लस 

दैनिक गोमंतक
शुक्रवार, 23 एप्रिल 2021

गेल्या काही दिवसांपासून  राज्यात कोरोना रुग्णांमध्ये वेगाने वाढ होत आहे. वाढत्या कोरोना रुग्णांमुळे दिवसागणिक ही स्थिती अधिक भयावह होत चालली आहे. तर राज्यसरकारही रुग्णांना सर्व उपचार वेळेत मिळण्यासाठी सरकारी पातळीवर मोठी धडपड सुरू आहे.

पणजी : गेल्या काही दिवसांपासून  राज्यात कोरोना रुग्णांमध्ये वेगाने वाढ होत आहे. वाढत्या कोरोना रुग्णांमुळे दिवसागणिक ही स्थिती अधिक भयावह होत चालली आहे. तर राज्यसरकारही रुग्णांना सर्व उपचार वेळेत मिळण्यासाठी सरकारी पातळीवर मोठी धडपड सुरू आहे. गुरुवारी दिवसभरात 1502  रुग्ण कोरोना बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली तर 17  कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.  या पार्श्वभूमीवर राज्यातील नागरिकांना मोफत कोरोना लसीकरण करण्यात येणार असल्याची घोषणा गुरुवारी राज्यसरकारने केली आहे. (State Government's big announcement: Citizens of the state will get free corona vaccine) 

Goa Muncipal Election 2021: आतापर्यंत 48.75 टक्के मतदानाची नोंद

राज्याचे अतिरिक्त सचिव (आरोग्य) विकास गौणेकर यांनी याबाबत माहिती दिली आहे. देशभरात येत्या 1 मे पासून 18 वर्षावरील सर्वांना कोरोना लसीकरण केले जाणार आहे. यासाठी महाराष्ट्राकडून पहील्या टप्प्यात राज्य सरकार सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडून पाच लाख कोव्हिशील्ड लसीचे डोस खरेदी करेल, असे विकास गौणेकर यांनी म्हटले आहे.  5 लाख लसीचे पाच लाख डोस घेण्यात येणार आहेत. दरम्यान मोफत कोरोना लसीची घोषणा करणारे गोवा हे पहिले राज्य नाही, याआधीही उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश , आसाम,   आणि छत्तीसगड या राज्य सरकारांनी देखील फ्री कोरोना लसीची घोषणा केली आहे. 

गोव्यात संचारबंदीच्या नियमांचा उडाला फज्जा; हरमल भागात हॉटस्पॉट जाहीर

देशात सर्वप्रथम उत्तर प्रदेश सरकारने मोफत कोरोना लस देण्याची घोषणा केली. यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी याबाबत घोषणा केली. '' केंद्र सरकारने जारी केलेल्या आदेशानुसार येत्या 1 मे पासून 18 वर्षावरील सर्वांना कोरोना लसीकरण केले जाणार आहे. राज्यातील सर्व नागरिकांना हे लसीकरण फ्री मध्ये केले जाईल, असा निर्णय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. तर दुसरीकडे आसामचे आरोग्यमंत्री हेमंता बिस्वा सरमा यांनी याबाबत बुधवारी ट्विट करत माहिती दिली.  “केंद्र सरकार 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना लस विनामूल्य देत आहे. तर आसाम सरकार 18 ते 45 वर्षे वयोगटातील सर्व लोकांना कोविड -19 ही लस विनामूल्य उपलब्ध करुन देईल, असे ट्विट हेमंत बिस्वा सरमा यांनी केले आहे. 

छत्तीसगडमध्ये कॉंग्रेस सरकारचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनीदेखील फ्री कोरोना लसीची घोषणा केली आहे. ''कॉंग्रेस सरकार आपले सर्व खर्च उचलणार आहे. आपल्या नागरिकांच्या संरक्षणासाठी सर्व शक्य पावले उचलण्यास सरकार तयार आहेत. राज्यात येत्या 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्व लोकांना विनामूल्य लसीकरण केले जाईल. कोणाकडूनही पैसे गोळा केले जाणार नाहीत.'' असे भूपेश बघेल यांनी म्हटले आहे. 

संबंधित बातम्या