Goa: सावर्डे दुपदरी रेल्वे मार्गास सुरक्षा मंडळाकडून हिरवा कंदील

दक्षिण पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी अनिश हेगडे (Anish Hegde) यांनी ही माहिती दिली.
Goa: सावर्डे दुपदरी रेल्वे मार्गास सुरक्षा मंडळाकडून हिरवा कंदील
Railway lineDainik Gomantak

मडगाव: मडगाव - चांदर- सावर्डे (Margao - Chander - Savarde) या 14 किमी अंतराच्या दुपदरी रेल्वे मार्गाच्या वापरास रेल्वे सुरक्षा मंडळाकडून (Security Board) हिरवा कंदील मिळाला आहे. दक्षिण पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी अनिश हेगडे (Anish Hegde) यांनी ही माहिती दिली. 23 सप्टेंबर रोजी सुरक्षा मंडळाने या नवीन मार्गावर रेल्वे इंजिन चालवून चाचणी घेतली होती. नवीन रेल मार्गाच्या दर्जाबाबतही सुरक्षा मंडळाने समाधान व्यक्त केल्याचे हेगडे यांनी सांगितले. सुरक्षा मंडळाने 124 किलोमीटर प्रतितास या गतीने ही चाचणी घेतली होती मात्र तूर्तास या मार्गावरून 90 किलोमीटर प्रतितास या गतीने रेल्वे चालविण्यास मंजुरी दिली असल्याचे संबंधित अधिकाऱ्याने सांगितले.

Railway line
Goa: गांजा प्रकरणी अटक केलेल्या मंतेशीचा न्यायालयाने नाकारला जामीन

या नवीन मार्गामुळे या 14 किलोमीटरच्या पट्ट्यात 6 नवीन अंडरपास आणि 2 नवीन पदपूल बांधण्यात आले असून त्यापैकी चांदर अंडरपासचे हल्लीच मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Chief Minister Pramod Sawant) यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले होते.

Related Stories

No stories found.