गोव्यात कोविड छायेत दोन दिवसांत 100 कोटींवर उलाढाल!

गोव्यात ऐन सणासुदीत ‘एटीएम’ रिकामे
गोव्यात कोविड छायेत दोन दिवसांत 100 कोटींवर उलाढाल!
Goa MarketDainik Gomantak

मडगाव: राज्यात (Goa) चतुर्थी (Ganesh Chaturthi) हा आनंदाचा उत्सव. त्यामुळे कोविडच्या छायेत लोक आर्थिक तंगीत असतानाही खरेदी करण्यासाठी हात आखडता घेत नाहीत हे गेल्या दोन दिवसांतील बाजारपेठेतील (Market) उलढालीवरून दिसून आले. दोन दिवसांत राज्यात तब्बल 100 कोटींहून अधिक उलाढाल झाल्याची माहिती व्यावसायिकांकडून मिळत आहे.

मडगाव, पणजी व म्हापसा या मुख्य तीन बाजारपेठांत झालेली खरेदी दिलासादायक असून मडगावात तीन दिवसांत 40 कोटींची उलाढाल असण्याची शक्यता व्यक्त केली जाते. एरव्ही कितीही काटकसर केली तरी चतुर्थीच्या वेळी खरेदी करण्यास गोवेकर हात आखडता घेत नाहीत. खाद्यपदार्थ, कपडे, मिठाई आणि शोभेचे सामान या वस्तूंना लोकांची मागणी जास्त होती. त्यामानाने इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि वाहन खरेदी या क्षेत्राला तुलनेने कमी प्रतिसाद मिळाल्याची माहिती उद्योग क्षेत्रातून मिळाली.

काकुलोज या प्रसिद्ध मॉलचे प्रवर्तक मनोज काकुलो यांना विचारले असता, गेल्या वर्षाच्या तुलनेत यावेळी ग्राहकांचा प्रतिसाद चांगला होता. लोक खरेदीसाठी यावेळी घरातून बाहेर आले. शेवटच्या दोन दिवसांत लोकांनी मॉल्समध्ये खरेदीसाठी रांगा लावल्याचे दिसून आले. मडगावचे उल्हास ज्वेलर्स या अस्थापनात लोकांची गर्दी दिसत होती.

या आस्थापनाचे विक्रम वेर्लेकर यांना विचारले असता, शेवटच्या दिवशी मिळालेला प्रतिसाद समाधानकारक होता असे त्यांनी सांगितले. चतुर्थीच्या सणामुळे गोव्याच्या बाजारपेठेत झालेली उलाढाल निश्चितच 100 कोटींच्या वर गेली असेल पण एरव्हीच्या काळात सणासुदीला ही उलाढाल 300 कोटींच्या वर जात होती ते पाहिल्यास हे प्रमाण कमी आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. कामाक्षी डिजिवर्ल्ड या चेन शोरूमचे मालक योगेश कुंकळयेकर म्हणाले, चतुर्थीच्या काळात लोकांनी कपडे आणि इतर गरजेच्या वस्तू खरेदी करण्यास काटकसर केली नसली तरी तुलनेने लक्झरी वस्तू असलेल्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंकडे त्यांनी पाठ फिरवली.

Goa Market
Goa Mining: खाणी ताब्यात घेण्यास गोवा सरकारकडून टाळाटाळ

म्हापसा बाजारपेठेतही मोठा व्यवसाय

म्हापसा येथील अखिल गोवा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नारायण कारेकर म्हणाले, की चतुर्थीच्या काळात केवळ गेल्या दोन-तीन दिवसांतच म्हापसा बाजारपेठेला ग्राहकांचा समाधानकारक प्रतिसाद मिळाला. त्यापूर्वी ग्राहकवर्ग अभावानेच बाजारपेठेत येत होता. त्यामुळे व्यापाऱ्यांना फार मोठी अर्थप्राप्ती झाली असे म्हणता येणार नाही. तरीसुद्धा सध्याच्या कोविडविषयक स्थिती पाहत हे समाधानकारक आहे. म्हापसा बाजारपेठेत साधारणत: दोन हजार व्यापारी आहेत, असे गृहीत धरून प्रत्येक व्यापाऱ्याची अथवा विक्रेत्याची चतुर्थीकाळातील प्रतिदिन उलाढाल दहा हजार गृहीत धरल्यास या बाजारपेठेची प्रतिदिन उलाढाल समारे दोन कोटी होते.

Goa Market
Goa Vaccination: शंभर टक्के लसीकरणाचा दावा कितपत खरा

ऐन सणासुदीत ‘एटीएम’ रिकामे

राज्यात ऐन सणासुदीच्या दिवसात एटीएममध्ये पैसे नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. पैसे न घेता बाजारात जाणाऱ्या नागरिकांची एटीएममध्ये पैसेच मिळत नसल्यामुळे मोठी गोची होत आहे. पुढील पाच दिवस बॅंका बंद आहेत. उत्सवकाळात मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो. त्यामुळे पैशाची गरज भासते. गेल्या आठवडाभरात खातेधारकांनी एटीएममधून पैसे काढले. बॅंकांकडून एटीएममध्ये पैसे जमा केले जात नसल्याने विविध भागांत एटीएममध्ये खडखडाट आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com