गोव्‍यात कोरोनाच्‍या रूग्‍णांचा आकडा ५० वर

dainik gomantak
रविवार, 24 मे 2020

आज नोंद झालेल्‍या रूग्‍णातील ७ महिला आहेत, तर ४ पुरूष आहेत. यामध्‍ये एका ५ वर्षाच्‍या मुलाचाही समावेश आहे. 

पणजी, 
राजधानी रेल्‍वेमधून आलेल्‍या ११ लोकांची कोरोना पडताळणी चाचणी पॉझिटिव्‍ह आल्‍याने राज्‍यात आता कोरोनाचे एकुण ५० रूग्‍ण झाले आहेत. आज नोंद झालेल्‍या रूग्‍णातील ७ महिला आहेत, तर ४ पुरूष आहेत. यामध्‍ये एका ५ वर्षाच्‍या मुलाचाही समावेश आहे. 
सध्‍याच्‍या परिस्‍थतीची माहिती देण्‍यासाठी आणि पुढील नियोजनासाठी गोव्‍याचे आरोग्‍यमंत्री विश्‍वजीत राणे आज मुख्‍यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेणार आहेत. राज्‍यात जे लोक येणार आहेत, त्‍यांच्‍याकडे असणारे कोरोना निगेटिव्‍ह प्रमाणपत्र ४८ तासांपुर्वीचे किंवा त्‍या कालावधीनंतरचे असणे आवश्‍‍यक असून याबाबतच्‍या योग्‍य त्‍या मागदर्शक सूचना जनतेलाही आज देण्‍यात येणार असल्‍याची माहिती आरोग्‍यमंत्री विश्‍‍वजीत राणे यांनी दिली. 

संबंधित बातम्या