गोव्यात विनामास्क फिरणाऱ्या लोकांना मास्क गिफ्ट

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 5 एप्रिल 2021

पणजी महानगरपालिकेचे महापौर वसंत आगशीकर यांनी आज पणजी पोलिसांकडे 500 मास्क प्रदान केले. पणजी पोलिस स्थानकाचे निरीक्षक सुदेश नाईक यांच्याकडे हे मास्क देण्यात आले.

पणजी: पणजी महानगरपालिकेचे महापौर वसंत आगशीकर यांनी आज पणजी पोलिसांकडे 500 मास्क प्रदान केले. पणजी पोलिस स्थानकाचे निरीक्षक सुदेश नाईक यांच्याकडे हे मास्क देण्यात आले. पणजी शहरात मास्क न घालता फिरणाऱ्यावर पणजी पोलिसांनी परवापासून कारवाई सुरू केली आहे. विनामास्क फिरणाऱ्यांकडून 200 रुपये दंड वसूल केला जात आहे. 

उद्यापासून पोलिस दंड आकारतानाच आगशीकर यांनी दिलेले मास्क लोकांना देणार आहेत. याबाबत बोलताना आगशीकर यांनी सांगितले की, राज्यात कोरोना वाढला आहे. लोकांनी विनामास्क घरातून बाहेर पडू नये. पोलिस कारवाई करतात, त्यावेळी त्यांनी विनामास्क फिरणाऱ्यांना मास्कही द्यावा. या हेतूने आपण हे मास्क दिल्याचे आगशीकर यांनी सांगितले. कोरोना नियंत्रणात यावा, यासाठी सरकारबरोबरच सामान्य लोकांनीही प्रयत्न करणे गरजेचे आहे.

सावधान! फोंडा भागातून एकटे जात असाल, तर कृपया काळजी घ्या 

कोरोना नियमावलीचे पालन करून तोंडाला मस्क लावून बाहेर पडावे, सुरक्षित अंतर ठेऊन राहावे, हे नियम लोकांनी पाळावेत. आम्हाला लोकाना दंड देण्यासाठी आनंद वाटत नाही, मात्र शिस्त लागावी यासाठी दंड केला जातो. लोकांनी नियम पाळल्यास दंड करण्याची पाळी आमच्यावर येणार नाही, अशी प्रतिक्रिया पोलिस निरीक्षक सुदेश नाईक यांनी व्यक्त केली. उद्यापासून ज्याने मास्क घातलेला नाही, त्याला दंड केला जाईल व त्यानंतर मोफत मास्क देण्यात येईल, असे नाईक म्हणाले.

गोवा राज्य बेरोजगारीत देशात दुसऱ्या क्रमांकावर!

संबंधित बातम्या