Goa Festivals : उत्सवांत नियमांचे पालन करा

कोरोनाबाधितांमध्ये वाढ झाल्याने आरोग्य खात्याचे नागरिकांना आवाहन
Goa Festival
Goa Festival Dainik Gomantak

Goa Festivals : राज्यात गणेशोत्सवची जोरदार तयारी सुरू आहे. मात्र दुसरीकडे कोरोनाची तिसरी लाट अद्यापही ओसरलेली नसून रुग्णांचे प्रमाण वाढतच आहे. त्यामुळे नागरिकांनी मास्क वापरण्याबरोबर गर्दीच्या ठिकाणी जाण्याच्या नियमांचे पालन करावे आणि बूस्टर डोस तातडीने घ्यावा असे आवाहन आरोग्य खात्याचे डॉ. राजेंद्र बोरकर आणि डॉ.प्रशांत सूर्यवंशी यांनी केले आहे.

आरोग्य प्रशासनाच्या वतीने खात्याच्या कार्यालयात गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. डॉ. सूर्यवंशी म्हणाले, राज्यात गेल्या आठवड्याभरात कोरोना बाधितांचे आणि सक्रिय रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. गोव्यात सध्या 941 एकूण सक्रिय रुग्ण झाले आहेत. यापूर्वी अधिकच्या उपचारासाठी रुग्णालयात भरती होणाऱ्यांचे प्रमाण कमी होते आता ते वाढत आहे. आज 9 जणांना अधिकच्या उपचारासाठी रुग्णालयात भरती केले आहे. बुधवारी 200 तर काल 180 नवे बाधित सापडले आहेत. हे संक्रमणाचे प्रमाण (पॉझिटिव्हिटी रेट) 14.9 टक्के झाले आहे.

56 टक्के लोकांचे लसीकरणच नाही

कोरोनाच्या आतापर्यंत बळी गेलेल्या 3957 नागरिकांपैकी 56 टक्के नागरिकांनी लसीकरणाचा एकही डोस घेतलेला नव्हता. त्यामुळे लसीकरणाला कोणताच पर्याय नाही हे स्पष्ट होते. 15 ते 17 वयोगटातील 94 मुलांनी कोरोनाचा पहिला डोस घेतला आहे. तर ८२ टक्के मुलांनी कोरोनाचा दुसरा डोस घेतला आहे.

Goa Festival
Goa Accident : गोव्यात अपघातांत सरासरी 3 दिवसांत 2 मृत्यू

..अन्यथा डोस इतर राज्यांना द्यावे लागतील

केंद्र सरकारकडून मिळालेले लसीकरणासाठीचे वेगवेगळे डोस नागरिकांनी वापरले नाहीत, तर ते इतर राज्यांना वर्ग करण्यात येतील. कारण हे डोस योग्य त्या मुदतीमध्येच वापरले पाहिजे. अन्यथा ते खराब होऊ शकतात. त्यामुळे राज्यातील सर्वच स्तरांमधील नागरिकांनी कोरोनाचे बुस्टर आणि इतर डोस तातडीने घ्यावेत असा आवाहन डॉ. सूर्यवंशी यांनी केले.

बूस्टर डोसला अत्यल्प प्रतिसाद

18 ते 59 वयोगटातील केवळ पाच टक्के नागरिकांनी बूस्टर डोस घेतला आहे. हे प्रमाण अत्यल्प असून या वयोगटात नऊ लाख लोकसंख्या येते. त्यापैकी केवळ 48,463 जणांनी बूस्टर डोस घेतला आहे. तर 60 वर्षाहून अधिकच्या वयोगटातील 53 टक्के नागरिकांनी बूस्टर डोस घेतला आहे. पात्र असलेल्या एक लाख पन्नास हजारांपैकी 75 हजार पेक्षा जास्त नागरिकांनी बूस्टर डोस घेतला आहे. ही काहीशी समाधानकारक बाब असली तरी या वर्गातील 100 नागरिकांनी लस घेतली पाहिजे असे डॉ. बोरकर म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com