कोरोना नियंत्रणात ठेवण्यास गोवा सरकारच्या आरोग्य खात्याला यश

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 23 फेब्रुवारी 2021

आरोग्य खात्याने आज दिलेल्या माहितीनुसार, आज दिवसभर 29 कोरोना संसर्ग झालेले नवे रुग्ण सापडले तर दिवसभरात कोरोना संसर्ग होऊन उपचार घेणाऱ्या 53 व्यक्ती बऱ्या झाल्या.

पणजी: आरोग्य खात्याने आज दिलेल्या माहितीनुसार, आज दिवसभर 29 कोरोना संसर्ग झालेले नवे रुग्ण सापडले तर दिवसभरात कोरोना संसर्ग होऊन उपचार घेणाऱ्या 53 व्यक्ती बऱ्या झाल्या. आजच्या दिवशी कोरोनावर उपचार घेणाऱ्या व्यक्तींची संख्या 468 झाली आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे संकट वाढत असतानाच गोव्यात मात्र कोरोना नियंत्रणात ठेवण्यास गोवा सरकारच्या आरोग्य खात्याला यश आले आहे. गेले सलग तीन दिवस कोरोनामुळे एकाही व्यक्तीला आपले प्राण गमवावे लागलेला नाही. गोव्यासाठी ही दिलासा देणारी बाब आहे. शुक्रवारी कोरोनामुळे एक बळी गेला होत्या. त्यापूर्वी दोन दिवस एकही बळी गेला नव्हता. त्यामुळे गेल्या सहा दिवसात कोरोना संसर्ग झालेल्यापैकी फक्त एका व्यक्तीचे निधन झाले आहे. महराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण व कोरोनामुळे होणारे मृत्यूही वाढत असल्याने तेथील सरकारने विविध ठिकाणी लॉकडाऊन लावण्याची प्रक्रिया सुरु केलेली असताना लाखो देशी पर्यटक येणाऱ्या गोव्यात मात्र कोरोनांचा संसर्ग कमी प्रमाणात दिसून येत आहे. याला कारण आरोग्य खाते करत असलेल्या उपाययोजना आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अश्लील टिप्पणी केल्याबद्दल गोव्यातील डीजेला अटक 

राज्यात लसीकरणाचा 17 हजाराचा टप्प पूर्ण

गोव्यात कोविड प्रतिबंधक लसीकरणाची मोहीम वेगाने सुरु आहे. गोव्याने 17 हजाराचा टप्पा गाठलेला आहे. आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार आज २२ रोजी दिवसभरात 708 व्यक्तींना कोविड प्रतिबंधक लस टोचण्यात आली. यात डॉक्टर, परिचारिका व आरोग्य कर्मचारी मिळून 302 जणांनी व पोलिस, सुरक्षा रक्षक व कोरोना नियंत्रणासाठी काम करणारे अधिकारी मिळून 406 जणांनी कोविड प्रतिबंधक लस टोचून घेतली. गोव्यात आजपर्यंत डॉक्टर व आरोग्य खात्याच्या कर्मचाऱ्यांना मिळून 11470 जनांनी कोविड प्रतिबंधक लस टोचून घेतली आहे. तर पोलिस, सुरक्षा रक्षक व अधिकारी मिळून 5046 जणांनी कोविड प्रतिबंधक लस टोचून घेतली आहे. डॉक्टर, परिचारिका व आरोग्य कर्मचारी मिळून 1466 जनांनी दुसरा डोस घेतलेला आहे. त्यामुळे आतापर्यंत पहिला व दुसरा डोस मिळून राज्यात 17981 इतके कोविड प्रतिबंधक लसीकरण झाले आहे.

कर्नाटकने म्हादईच्या पळवलेल्या पाण्याची सर्वोच्च न्यायालय पाहणी करणार 

संबंधित बातम्या