गोवा: आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी नागरिकांना लस घेण्याचे केले आवाहन

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 13 एप्रिल 2021

राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालल्यामुळे आरोग्याच्या दृष्ट्या साधनसुविधा बळकट करण्यावर भर देण्यात येत आहे.

सासष्टी : कोरोना विरोधात लढण्यासाठी लस हे प्रभावी शस्त्र आहे. राज्यातील नागरिकांनी ही लस घ्यावी, यासाठी विविध जागृती उपक्रम तसेच शिबिर आयोजित करण्यात येत असल्यामुळे कोरोना लस घेणाऱ्यांची संख्या 7 हजाराचा वर पोहचली असून नागरिकही स्वतःहून पुढे आल्यास मोठ्या प्रमाणात लसी देण्यास शक्य होणार, असे   आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी सांगितले. . 

दक्षिण गोव्यातील विविध इस्पितळ तसेच आरोग्य केंद्रात कोरोनाची स्थिती व लसीची माहिती जाणून घेण्यासाठी राणे यांनी आज भेटी दिल्या. नावेली, धारबांदोडा, चिंचिणी, शिरोडा, मडगाव टीबी इस्पितळ फोंडा व कुडतरी आरोग्य केंद्रात भेट देऊन डॉक्टरकडे चर्चा केली. नावेली आरोग्य केंद्राला भेट दिली असता, पत्रकारांशी बोलताना त्यांनी वरील माहिती दिली. (Goa Health Minister Vishwajeet Rane appealed to the citizens to get vaccinated)

गोवा फॉरवर्ड पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर

राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालल्यामुळे आरोग्याच्या दृष्ट्या साधनसुविधा बळकट करण्यावर भर देण्यात येत आहे. कोरोना महामारीव नियंत्रण ठेवण्यासाठी मागच्या वर्षातील अनुभवाचा वापर या वर्षी होत आहे. कोरोनाविरुध्द लढण्यासाठी डॉक्टर्स दिवस रात्र मेहनत करीत असून मंत्री म्हणून या डॉक्टरांना फक्त आदेशच न देता, त्यांना सहकार्य करणे गरजेचे आहे, असे राणे यांनी सांगितले. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढलेली आहे. पण, राज्यात लॉकडाऊन होणार नाही. त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी मास्क तसेच सोशयल डिस्टन्सिगचे पालन करुन स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे. सध्या कोरोनाची लस देण्यावर भर देण्यात येत असून गोव्यात अतिरिक्त लसी पुरवठा करण्यात येणार आहे, असे विश्वजित राणे यांनी सांगितले. 

संबंधित बातम्या