Goa Health: गोवा सरकार 270 कोटी रुपये खर्च करून कर्करोगावरील हॉस्पिटल बांधणार ?

केंद्राच्या मदतीने 270 कोटी रुपये खर्च करून कर्करोगावरील हॉस्पिटल बांधण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत, असे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी सांगितले.
Goa Health
Goa HealthDainik Gomantak

Goa Health: वाळपई शहरी भागासह गावांतील लोकांनाही वेळीच उपचार मिळाले पाहिजेत. प्राथमिक रक्त तपासणीची सोय ग्रामीण भागात उपलब्ध करण्यात येणार आहे. महिलांत स्तन कर्करोगाचे प्रमाण वाढत चालले आहे.

त्यासाठी महिलांनी नियमित स्तनांची तपासणी करावी. केंद्राच्या मदतीने 270 कोटी रुपये खर्च करून कर्करोगावरील हॉस्पिटल बांधण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत, असे प्रतिपादन आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी केले.

नगरगाव ग्रामपंचायत सभागृहातील आरोग्य, रक्तदान शिबिर उदघाटन कार्यक्रमात ते बोलत होते. नगरगाव ग्रामपंचायत, वाळपई आरोग्य केंद्र, एएसजी हॉस्पिटल आणि सार्थक फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने काल हे शिबिर आयोजिले होते.

यावेळी आरोग्य खात्याच्या संचालक डॉ. गीता काकोडकर, नगरगावच्या सरपंच संध्या खाडिलकर, उपसरपंच रामू खरवत, पंच मामू खरवत, राजेंद्र अभ्यंकर, उर्मिला गावस, चंद्रकांत मानकर, देवयानी गावकर, आरोग्याधिकारी डॉ. रूपचंद नावेलकर, डॉ. शॉन डिसिल्वा, सुदेश नार्वेकर, सूर्याजीराव राणे, डॉ. श्‍याम काणकोणकर, डॉ. अभिजीत वाडकर, अकीब शेख, विनायक गावकर, कालिदास हरवळकर उपस्थित होते.

Goa Health
Goa Agriculture: नवीन धारेचे ‘हुर्राक’ बाजारात दाखल

वैद्यकीय तज्ञांचा सन्मान

यावेळी संध्या खाडिलकर, डाॅ. गीता काकोडकर यांनीही मनोगत व्यक्त केले. राजेंद्र अभ्यंकर यांनी आभार मानले. सूत्रनिवेदन मधुरा वझे यांनी केले. नितेश सावंत यांनी योगा प्रात्यक्षिकांसह ध्यानधारणेविषयी माहिती दिली.

यावेळी डॉ. स्वेच्छा कामत, डॉ. श्‍याम काणकोणकर, डॉ. रोहन मोरजकर, डॉ. साहील अहमद, डॉ. महेंद्र पाऊसकर, डॉ. अमृता वेणूगोपाळ, डॉ. प्रीतिजा परब, डॉ. प्रणिता परब, तन्मय बांबुर्डे, अनिशा गावकर, डॉ. विदेश जल्मी, डॉ. नताशा धुरी, साहिशा गांजेकर, निकीता, स्टेला यांचा राणे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com