Goa: महामार्गाची पाहणी म्हणजे धूळ फेक; भारत बागकर

महामार्ग (Highway) रस्त्याची मंत्र्यांनी पाहणी करणे ही पेडणे वासियांच्या (Pedne) डोळ्यात धूळ फेकणे सारखे –आहे असे पेडणे नागरिक समितीचे अध्यक्ष भारत बागकर (Bharat Bagkar) यांनी दावा केला आहे.
Goa: महामार्गाची पाहणी म्हणजे धूळ फेक; भारत बागकर
Highway

महामार्ग (Highway) रस्त्याची मंत्र्यांनी पाहणी करणे ही पेडणे वासियांच्या (Pedne) डोळ्यात धूळ फेकणे सारखे –आहे असे पेडणे नागरिक समितीचे अध्यक्ष भारत बागकर (Bharat Bagkar) यांनी दावा केला आहे. गेली तीन चार वर्षे लोकं समस्याना सामोरे जात आहेत, खूप अपघात, वाहनांची हानी, काहींनी जीव गमावले, दररोज या रस्त्यावर प्रवास करणाऱ्या मंत्र्याना या रस्त्याचे निष्कृष्ट काम दिसत नाही का, वर्ष भर व खास करून पावसात काय दुर्दशा होतं ते दिसत असताना हा फार्स कशासाठी. असा प्रश्न बागकर यांनी उपस्थित केला आहे.

एवढे मोठे उपमुख्यमंत्री पद व कंत्राट दाराला वॉर्निंग देऊ शकत नसतील तर मोठे पद जनतेच्या काय कामाचे. पावला पावलावर कंत्राटदाराने चुका केल्या आहेत. धारगळ विकास नर्सरी च्या (Dhargal Vikas Nursery) बाजूचा सर्विस रोड वाहून गेला, दोन खांब येथे क्रॉसिंग कसे करणार कुणालाच माहित नाही, ठीक ठिकाणी दिशा फलक लावावे म्हणून कंत्राट दाराला बैठक घेऊन सांगावे लागते या पेक्षा दुर्दैव कोणते. रेडकर हॉस्पिटल (Redkar Hospital) जवळून सुके कुळण जाण्यासाठी दिशा फलक नव्हता तेव्हा त्या भागात लोकांना कीती त्रास झाला असतील याची जाणीव मंत्र्याला कशी नाही असे सांगितले. मंत्री बाबू आजगावकर (Babu Azgavkar) या रस्त्यावरून पेडणेत येतात त्यावेळी त्याना रस्त्याच्या कामाची स्थिती लक्षात कशी येत नाही .अस प्रश्न भारत बागकर यांनी उपस्थित केला.

Highway
Goa Politics: "घोटाळा लपविण्यासाठी उर्फान मुल्ला भाजपमध्ये"

या राष्ट्रीय रस्त्याच्या कामाविषयी वेळोवेळी पेडणे नागरिक समितीने आवाज उठवला , सरकारला निवेदन दिली , प्रकरण न्यायालयात पोचवले , तरीही सरकारला जाग येत नाही .मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनीही या रस्त्याची मंत्र्यासोबत अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पाहणी केली त्यावेळी अधिकाऱ्यांना जी सुचना आणि आदेश मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी दिला होता त्याची कितपत कार्यवाही झाली आणि त्याचा सरकारने , स्थानिक आमदाराने कितीवेळा पाठपुरावा केला याची मंत्र्यांनीच उत्तरे द्यावीत.राष्ट्रीय महामार्गाचे काम हाती घेण्याअगोदर सर्विस रस्त्यासाठी अजून जागा संपादित केली नाही .

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com