विद्यार्थ्यांपर्यंत निकाल कसा पोचवणार ऑनलाइन की पोस्टलाइन?

GOA How the results of 1st to 11th will reach the students
GOA How the results of 1st to 11th will reach the students

काणकोण(Canacona): (Goa Education Board )शैक्षणिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी प्रगती पुस्तक विद्यार्थ्यांच्या(Students) हातात देऊन शैक्षणिक वर्षाची शेवटची घंटा वाजविण्याची शिक्षण(Education) प्रक्रियेची परंपरा आहे. मात्र, गेल्या वर्षापासून या परंपरेत खंड पडला आहे. त्यामुळे पहिली ते नववी(9th) व अकरावीचा(11th) निकाल(Result) विद्यार्थ्यांपर्यंत कसा पोचवणार हा शैक्षणीक संस्थांसमोर प्रश्न आहे. गेल्यावर्षी कोरोना(Corona) महामारीचा या वर्षीच्या तुलनेत उद्रेक कमी होता. त्यामुळे काही विद्यालयांनी(Schools) घरपोच निकालपत्र विद्यार्थ्यांच्या घरी पोचवले. मात्र, ती परिस्थिती नाही. पोस्टाने(Post) निकाल विद्यार्थ्यांपर्यंत पोचवणे जास्त विद्यार्थी असलेल्या शिक्षण संस्थांना त्रासदायक ठरणार आहे.(GOA How the results of 1st to 11th will reach the students)

ऑनलाईन(Online) शिक्षणासाठी शिक्षकांनी प्रत्येक वर्गाचे व्हॉटसअप ग्रुप्स केले आहेत. त्या ग्रुपवर सर्व विद्यार्थ्यांचा निकाल लोड करणे शक्य आहे. मात्र, त्यामध्ये निकालाची गोपनियता राहणार नाही. एका विद्यार्थ्याचा निकाल दुसऱ्या विद्यार्थ्याला कळून गोंधळ होण्याची शक्यता आहे.  सात मे रोजी या शैक्षणीक वर्षाचा शेवटचा दिवस होता. मात्र, काही विद्यालयांनी या विवंचनेमुळे अद्याप निकाल जाहीर केला नाही.

काणकोणमधील शाळांना यंदा प्रथमच शाळेची शेवटची घंटा म्हणजेच शैक्षणिक वर्ष संपण्याआधीच पहिली ते आठवीपर्यंतची क्रमिक पुस्तके विद्यालयांना पुरवण्यात आली आहेत. एप्रिल महिन्यातच ही पुस्तके शाळाकडे देण्यात आली आहेत. एरव्ही शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर जून - जुलै महिन्यात सर्व शिक्षा अभियानांतर्गत क्रमिक पुस्तकांचा पुरवठा करण्यात येत होता. मात्र, यंदा वर्ग, परीक्षा सर्वच ऑनलाईन झाल्याने विद्यार्थी शाळांमध्ये आले नाहीत.

आता माध्यान्ह आहाराच्या सामानाचा पुरवठा शिक्षण खात्याने सबंधीत शाळांना केला आहे. त्यामुळे त्यांच्या मुलांची क्रमिक पुस्तके, प्रगती पुस्तक व माध्यान्ह आहाराचे सामान एकत्रितपणे पालकांना शाळेत बोलावून त्यांच्या हवाली करण्याचा निर्णय काही शैक्षणिक संस्थांनी घेतला होता. मात्र, रविवारपासून संचारबंदी लागू झाल्याने पालकांना शाळेत जाण्यास मुभा मिळेल काय या बाबत पालक संभ्रमात असल्याचे चावडी येथील एक पालक शंकर नाईक यांनी सांगितले. यावर तोडगा म्हणून शाळांकडे असलेल्या बालरथाचा वापर करून तिन्ही गोष्टीचे वितरण एकत्रितरित्या मुलांच्या घराच्या बाहेर पोचविण्याचे शाळा चालकांनी करावे, अशी मागणी नाईक यांनी केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com