Goa: आंतरराष्ट्रीय गायन स्पर्धेत हृषिकेश ढवळीकरचा द्वितिय क्रमांक

प्रथम पुरस्कार पुणेच्या मैत्रेयी भोसलेस तर द्वितिय पुरस्कार हृषिकेश व देविका अंकुलगे (पुणे) यांना विभागुन देण्यात आला.
Goa: आंतरराष्ट्रीय गायन स्पर्धेत हृषिकेश ढवळीकरचा द्वितिय क्रमांक
हृषिकेश ढवळीकरDainik Gomantak

फातोर्डा: सुरंजन ट्रस्टने आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय ऑनलाईन (Online)हिंदुस्तानी शास्त्रीय खयाल गायन (Classical idea singing)स्पर्धेत फोंडा, गोवा येथील हृषिकेश ढवळीकर यास द्वितिय क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झाला. हृषिकेश हा अभिनव कला मंदिराचा विद्यार्थी आहे.

गेल्याच महिन्यात हृषिकेशला रामाश्रय रामरंग समितीने आयोजित केलेल्या गायन स्पर्धेतही द्वितिय पुरस्कार प्राप्त झाला होता.

हृषिकेश ढवळीकर
Goa Politics: फातोर्डा मतदारसंघात कॉंग्रेसला खिंडार

सुरंजन ट्रस्टच्या स्पर्धेचे परिक्षक (Examiner)म्हणुन पंडित रघुनंदन पणशीकर व डॉ. आश्र्विनी भिडे-देशपांडे यांनी काम पाहिले. या स्पर्धेत हृषिकेशने यमन राग सादर केला. तबल्यावर त्याला त्याचे वडील नितीन ढवळीकर यांनी साथ दिली.

प्रथम पुरस्कार पुणेच्या मैत्रेयी भोसलेस तर द्वितिय पुरस्कार हृषिकेश व देविका अंकुलगे (पुणे) यांना विभागुन देण्यात आला. या स्पर्धेत देशातील व देशाबाहेरील अनेक मुलांनी भाग घेतल होता.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com