Goa Board 12th Result 2022: बारावीचा निकाल 21 मे रोजी होणार जाहीर

Goa Board 12th Result 2022 : 21 रोजी संध्याकाळी 5 वाजता अधिकृत वेबसाईटवर निकाल पाहता येणार आहे.
Goa Board 12th Result 2022
Goa Board 12th Result 2022 Dainik Gomantak

Goa Board 12th Result 2022 : गोवा बोर्डाने बारावीच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. येत्या शनिवार 21 मे ला बारावीचा निकाल लागणार आहे. 21 रोजी संध्याकाळी 5 वाजता https://www.gbshse.info या अधिकृत वेबसाईटवर निकाल पाहता येणार आहे. (Goa HSSC results will be announced on May 21 2022)

Goa Board 12th Result 2022
खाणी सुरु होईपर्यंत दर महिना कामगारांना भत्ता द्यावा, मुख्यमंत्र्यांना निवेदन

बारावीच्या परीक्षेत 18,215 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 8,937 मुले आणि 9,278 मुली होत्या. बारावीचा निकाल या आठवड्याच्या शेवटी जाहीर होण्याची शक्यता आहे. पण निकालाची तारीख अजून ठरलेली नाही, असे गोवा बोर्डाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

गोव्यातील 106 उच्च माध्यमिक संस्थांमधील विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. यामध्ये वाणिज्य शाखेसाठी 5,502 विद्यार्थ्यांनी, विज्ञान शाखेसाठी 5,080, कला शाखेसाठी 4,757 आणि व्यावसायिक शाखेसाठी (Vocational Education) 2,876 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.

2021 चा बाराविचा निकल 99.40 टक्के इतका लागला होता. दरम्यान यावर्षी निकालाची टक्केवारी वाढण्याची आशा बोर्डाला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com