Goa: मी मुख्यमंत्रिपदासाठी दावेदारी केलेली नाही; श्रीपाद नाईक

मुरगांव बंदरातील आंतरराष्ट्रीय क्रुझ टर्मिनल जवळ 'द पीयर' रेस्टॉरंटचे उद्घाटन जलमार्ग राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.
मुरगांव बंदरातील आंतरराष्ट्रीय क्रुझ टर्मिनल जवळ 'द पीयर' रेस्टॉरंटचे उद्घाटन करताना जलमार्ग राज्यमंत्री श्रीपाद नाईक. सोबत राजीव जलोटा व इतर.
मुरगांव बंदरातील आंतरराष्ट्रीय क्रुझ टर्मिनल जवळ 'द पीयर' रेस्टॉरंटचे उद्घाटन करताना जलमार्ग राज्यमंत्री श्रीपाद नाईक. सोबत राजीव जलोटा व इतर.Dainik Gomantak

दाबोळी: मी मुख्यमंत्रिपदासाठी दावेदारी केलेली नाही. भविष्यातही करणार नाही. मला मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी द्यावी की नाही हे श्रेष्ठींनी ठरविले पाहिजे. कसलीही जबाबदारी दिल्यास ती योग्यरित्या पार पाडण्यास समर्थ आहे. आतापर्यंत देण्यात आलेल्या जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडल्या आहेत. आता जी जबाबदारी दिली आहे ती योग्यरित्या पार पाडीत असल्याचे केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी येथे शुक्रवारी कार्यक्रमानंतर पत्रकारांना एका कार्यक्रमानंतर सांगितले.

मुरगांव बंदरातील आंतरराष्ट्रीय क्रुझ टर्मिनल जवळ 'द पीयर' रेस्टॉरंटचे उद्घाटन जलमार्ग राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सन्माननीय अतिथी म्हणून एमपीटीचे अध्यक्ष राजीव जलोटा (आय.ए.एस.) व कॅप्टन ऑफ पोर्टचे कॅप्टन जेम्स ब्रागांझा तसेच किरण ठाकूर उपस्थित होते.

मुरगांव बंदरातील आंतरराष्ट्रीय क्रुझ टर्मिनल जवळ 'द पीयर' रेस्टॉरंटचे उद्घाटन करताना जलमार्ग राज्यमंत्री श्रीपाद नाईक. सोबत राजीव जलोटा व इतर.
पोर्तुगीजकालीन गोव्यातील गणेशोत्सव

विधानसभा निवडणुकीनंतर भाजपा पुन्हा सत्तेवर येणार असल्याचे त्यांनी ठासून सांगितले. कुंभारजुवे मतदारसंघातील उमेदवारासाठी केंद्रीय निवड समिती योग्य तो निर्णय घेईल. जे चांगले उमेदवार असतील त्यांची नावे निवड येणाऱ्या समिती केंद्रीय समितीकडे पाठवतात. त्यानंतर ते योग्य त्या उमेदवाराची निवड करतात. कुंभारजुवे किंवा इतर मतदारसंघातील उमेदवार कोण हे आम्ही ठरवू शकत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

येथील पर्यटनविषयक साधन सुविधासंबंधी जे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत त्यासंबंधी लवकरच कार्यवाही होईल. गोव्यात पर्यटनविषय साधनसुविधा वाढविण्यासाठी राज्य सरकारने केंद्र व केंद्रीय पर्यटन मंत्रालयाचे सहकार्याने हे घ्यावे.यासंबंधी राज्य सरकारकडे बोलणी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. मुरगाव बंदरातील बंद झालेली कंटेनर सेवा पुन्हा सुरू झाली आहे. कंटेनर सेवेला उर्जा लाभावी यासाठी आम्ही केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या सहकार्याने आवश्यक असलेल्या क्रेनची व्यवस्था करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com