Goa IFFI 2022: चित्रपटांचे वेळापत्रक आठ दिवस आधीच

Goa IFFI 2022: ‘एनएफडीसी’कडे सूत्रे आल्याने कारभारात सकारात्मक बदल
IFFI 2022  | Goa News
IFFI 2022 | Goa NewsDainik Gomantak

Goa IFFI 2022: भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे काऊंटडाऊन सुरू झाले आहे. यापूर्वी इफ्फीच्या आदल्या दिवशी चित्रपटांचे चार दिवसांचे वेळापत्रक प्रतिनिधींसाठी खुले व्हायचे. परंतु भारतीय राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाकडे (एनएफडीसी) या महोत्सवाची सूत्रे आल्याने आठ दिवस अगोदरच इफ्फीच्या संकेतस्थळावर चित्रपटांचे वेळापत्रक अपलोड झाले आहे.

वेळापत्रकात काही ठिकाणी मोकळ्या जागा आहेत. मात्र, त्याठिकाणचे चित्रपट काही दिवसांत अपलोड होतील, असे संबंधितांकडून सांगण्यात आले. यापूर्वी केंद्रीय माहिती व प्रसारण खात्याच्या मार्गदर्शनाखाली चित्रपट महोत्सव संचालनालय (डीएफएफ) महोत्सवाचे नियोजन करत होते. त्यांना राज्य स्तरावर गोवा मनोरंजन संस्था सहकार्य करीत असते.

या महोत्सवाच्या निमित्ताने एनएफडीसी यापूर्वी फिल्म बझारचे आयोजन करीत होती, तेही त्रयस्त ठिकाणी. मात्र, यंदा एनएफडीसीकडे या महोत्सवाची पूर्ण सूत्रे आल्यामुळे महोत्सवाचे कामही गतीने सुरू झाले आहे.

इफ्फीच्या संकेतस्थळावर आठ दिवस अगोदरच चित्रपटांचे वेळापत्रक अपलोड झाल्याने हा रसिकांसाठी आश्‍चर्याचा धक्काच आहे. कोणता चित्रपट कोणत्या थिएटरमध्ये दाखविला जाणार आहे, त्यानुसार नियोजन करणे रसिकांना शक्य होणार आहे. ऑनलाईन पद्धतीने बुकिंग सुरू झाले नसले तरी ते दोन दिवस अगोदर सुरू होण्याची शक्यता दिसते.

IFFI 2022  | Goa News
53rd Iffi Goa: मधुर भांडारकर यांच्या 'इंडिया लॉकडाऊन'चा इफ्फीत वर्ल्ड प्रीमियर 

फिल्म बझारप्रमाणेच इफ्फीतही झगमगाट

यंदा अनेक महत्त्वाचे नियोजित कार्यक्रमही केंद्रीय प्रसारण खात्याच्या संकेतस्थळावरून एनएफडीसी जाहीर करत आहे. एनएफडीसी ज्या पद्धतीने फिल्म बझारचे आयोजन करते, त्याच पद्धतीचा झगमगाटही यंदाच्या इफ्फीत रसिकांना पाहायला मिळू शकतो.

फिल्म बझारच्या निमित्ताने येणारे कलाकार इफ्फीकडे फिरकत नाहीत, परंतु हे कलाकार आता इफ्फीत हजेरी लावण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com