Goa IFFI 2022: गुंतवणूकदारांच्या अपेक्षांचा सिनेमांवर परिणाम होतो- अभिनेत्री लासिया नागराज

Goa IFFI 2022: कन्नड चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आणि निर्माती लासिया नागराज फिल्म फेस्टिव्हलमध्ये उपस्थित होती.
Goa IFFI 2022 | lasya nagraj
Goa IFFI 2022 | lasya nagrajDainik Gomantak

Goa IFFI 2022: चित्रपट निर्मितीसाठी गुंतवणूकदार जास्तीत जास्त आर्थिक मदत देतात आणि त्यांची अपेक्षापूर्ती करण्याच्या नादात सिनेमाचे बझेट वाढते. परिणामी सिनेमा हिट होण्याऐवजी फ्लॉप होतो. हे कुठे तरी थांबायला हवे, यासाठीच मी माझ्या आगामी चित्रपटासाठी गुंतवणूकदारांशी बोलणी करायला 53व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील ‘फिल्म बझार’मध्ये आले आहे, असे कन्नड चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री व निर्माती लासिया नागराज हिने सांगितले.

कन्नड आणि तमिळ चित्रपटांत अनेक गुंतवणूकदार गुंतवणूक करण्यास तयार असतात. परंतु त्यांना चित्रपटाविषयीची संपूर्ण माहिती व्यवस्थित पटवून दिली जात नाही. 1 कोटीच्या बझेटमध्ये तयार होणाऱ्या चित्रपटासाठी 10 कोटी दिले जातात. हे 10 कोटी वसूल करण्यासाठी ज्या गोष्टींची आवश्यकता नाही, अशा गोष्टी सिनेमात अंतर्भूत केल्या जातात.

परिणामी सिनेमाची मुख्य संकल्पनाच नष्ट होते आणि हिट होणारा चित्रपट फ्लॉप होतो. त्यामुळे 1 कोटी रुपयांच्या बझेटमधल्या चित्रपटासाठी गुंतवणूकदारांना योग्य माहिती देऊन 1 कोटीच खर्च करायला हवेत, असे कन्नड चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री व निर्माती लासिया नागराज हिने सांगितले.

Goa IFFI 2022 | lasya nagraj
53rd IFFI 2022: लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणणे हेच मला पुढे जाण्यासाठी प्रेरणा देते- Actor Varun Sharma

कथ्थक आणि भरतनाट्यमपासून माझ्या सिनेसृष्टीतील करिअरला सुरवात झाली. माझी आई डॉ. सुधा नागराज हिची बंगळुरुमध्ये ‘आराधना इन्स्टिट्यूट ऑफ भरतनाट्यम्’ ही संस्था आहे. याच संस्थेत मी तीन वर्षांची असल्‍यापासून कथ्थक व भरतनाट्याचे धडे घेतले. एकदा टीव्ही मालिकेचे दिग्दर्शक दारशिट यांनी माझे नृत्य पाहिले आणि त्यांनी मला टीव्ही मालिकेत काम करण्याची संधी दिली. त्यानंतर कन्नड भाषेतील ‘बिग बॉस’सह

अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये मी काम केले. आजपर्यंत आठ सिनेमांमध्ये मी काम केले असून एका सिनेमाची निर्मिती स्वतः केली आहे, असे लासिया म्हणाली.

‘वेदा’च्‍या भूमिकेमुळे उत्साह’

6 कन्नड, 1 तेलगू आणि 1 ओडिया भाषेतील सिनेमात मी काम केले आहे. येत्या 26 डिसेंबरला प्रदर्शित होणाऱ्या ‘वेदा’ या चित्रपटात मला प्रमुख अभिनेत्रीची भूमिका मिळाली आहे. त्यामुळे प्रचंड उत्साही आहे. यापूर्वी कन्नड भाषेतील ‘दृश्यम-२’ चित्रपटातही महत्त्वाची पोलिस ऑफिसरची भूमिका मिळाली, असे लासिया म्‍हणाली.

Goa IFFI 2022 | lasya nagraj
Goa Crime News: गोव्यात ड्रग्सचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर; ओव्हरडोसमुळे महिलेची प्रकृती बिघडली

‘कुरिनजी’ चित्रपटाची निर्मिती

‘कुरिनजी’ या चित्रपटाची मी निर्मिती केली असून शैलेश रत्नकुमार यांनी तो दिग्दर्शित केला आहे. या चित्रपट निर्मितीसाठीच मी गुंतवणूकदारांना भेटण्यासाठी ‘फिल्म बझार’मध्ये आले आहे. त्यात मला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. अनेक गुंतवणूकदार माझ्या चित्रपटासाठी गुंतवणूक करण्यास इच्छुक आहेत, असे लासिया म्‍हणाली.

मराठीतील ‘बालक-पालक’ कन्नडमध्ये

मराठीतील ‘बालक-पालक’ चित्रपट कन्नड भाषेतही काढण्यात आला असून त्यातही मी भूमिका केली आहे. मराठीतील सई परांजपे हिने केलेली भूमिका मला या चित्रपटात मिळाली आहे. हा चित्रपट साकारत असताना खूप मज्जा आली, असे लासिया नागराज म्हणाली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com