Goa IFFI Festival: प्रतिनिधी नोंदणी 5 हजारांकडे! उद्‍घाटनाला सात दिवस बाकी

Goa IFFI Festival: 53 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (IFFI) आत्तापर्यंत प्रतिनिधींची नोंदणी संख्या पाच हजारांकडे पोहोचली आहे.
Goa IFFI Festival 2022
Goa IFFI Festival 2022Dainik Gomantak

Goa IFFI Festival: 53 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी इफ्फी (IFFI) आत्तापर्यंत नोंदणी केलेल्या प्रतिनिधींची संख्या पाच हजारांकडे पोहोचली आहे. ही नोंदणी ऑनलाईनपद्धतीने झालेली आहे. इफ्फीस प्रारंभ होण्यासाठी आणखी सात दिवस बाकी असून, तोपर्यंत आणखी काहींची नोंदणी होईल, असे गोवा मनोरंजन संस्थेला वाटते.

मनोरंजन संस्थेच्या आवारात सकाळपासून रात्रीपर्यंत धावपळ सुरू असल्याचे दिसत आहे. एका बाजूला आयनॉक्स परिसरात सुशोभीकरणाचे काम रात्र-दिवस कारागीर मंडळी करीत आहेत. तर दुसरीकडे गोवा मनोरंजन संस्थेच्या (ईएसजी) कार्यालयात सकाळपासून रात्री उशिरापर्यंत ये-जा सुरू झाली आहे.

Goa IFFI Festival 2022
Mopa Airport: मोपा विमानतळाला बांदोडकर यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी मांद्रे येथे धरणे

कार्यालयीन कामकाजासाठीची रचना करण्याचे काम सुरू झाले आहे. तर राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे (एनएफडीसी) प्रतिनिधी येत्या एक-दोन दिवसांत येऊन आपल्या कार्यालयाची उभारणी करण्याची शक्यता आहे. एनएफडीसीकडे इफ्फीची सूत्रे असल्याने यावर्षी चित्रपट महोत्सव महामंडळापेक्षा किती वेगळेपणा आणणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बांदोडकर मार्गावरील दोन्ही बाजूंच्या झाडींवर विद्युत रोषणाई करण्यात आहे.

आयनॉक्स परिसरात सध्या सजावट तयार करण्यासाठी विविध लाकडी नक्षीकाम केलेल्या प्रतिकृती तयार करण्यासाठी कारागीर मंडळी सकाळपासून कामाला लागलेली दिसतात. त्याशिवाय रेड कार्पेटसाठी जुन्या गोमेकॉच्या मुख्य इमारतीसमोरील प्रवेशद्वारावर व्यासपीठ उभारण्याचे कामही सुरू झाले आहे.

महामारीमुक्त वातावरण

आता महामारीमुक्त वातावरणात हा महोत्सव होत असल्याने सिने रसिकांत उत्साह वाढला आहे. आत्तापर्यंत ऑनलाईनपद्धतीने पाच हजारांच्या घरात प्रतिनिधी नोंदणी झाली आहे. सात दिवसांत आणखी ती वाढण्याची शक्यता आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com