IIT विरोधक मागे; कारवाईची भीती

प्रकल्प मार्गावर ‘प्रवेश बंद’चा फलक
Goa IIT
Goa IITDainik Gomantak

सांगे : सांगेत आयआयटी शैक्षणिक प्रकल्पाला काही स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध होत आहे. यामुळे प्रकल्प जमिनीवर प्रशासनाने प्रवेश निषिद्ध असल्याचे फलक लावलेत. शिवाय पोलिसांचा बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. तथापि, कारवाईच्या भीतीने अनेक जणांनी आंदोलनातून अंग काढून घेतले आहे.

Goa IIT
Sonali Phogat Case| सोनाली फोगाट प्रकरणाच्या तपासासाठी मुंबईतील सीबीआय पथक गोव्यात दाखल

सर्व्हे अधिकाऱ्यांकडून आज गुरुवारीही सर्व्हेक्षणाचे काम करण्यात आले. प्रस्तावित आयआयटी प्रकल्प परिसरात कलम 144 लागू केल्याने कारवाईच्या भीतीने शेतकरी आंदोलन थंडावत चालले आहे. दुसऱ्या बाजूने धरपकड सत्र सुरूच आहे. आजही सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याच्या कारणाने शेतकऱ्यांना सांगे पोलिस स्थानकात दिवसभर हजेरी लावण्याचे सत्र सुरू केले आहे. त्यामुळे अनेकजण आंदोलनापासून अलिप्त झालेत. तर काहींनी कायदेशीर पर्याय शोधायला सुरुवात केली आहे. सुरुवातीला प्रकल्पाला जीव तोडून विरोध करणारे आता काहीसे बॅकफूटवर आल्याने शेतकरी त्यांना वेगळ्या नजरेने पाहू लागलेत. तरीही शेतकऱ्यांमधील एक गट तीव्रतेने विरोध करण्यासाठी सर्व प्रकारचे मार्ग अवलंबत आहे.

सांगे पोलिसांनी कोणतीही पूर्वकल्पना न देता काहीजणांना स्थानकात बोलावून चौकशी केली. स्वतःच्या मालमत्तेत कोणी घुसला तर त्याला परिचय दाखवा म्हणणे आज सांगेत गुन्हा ठरत आहे. हा अन्याय फक्त राजकीय दबावाखाली येऊन घेतला जात असला तरी शेतकरी म्हणून आमचा लढा थांबणार नाही.

-जोसेफ फर्नांडिस, आंदोलक, सांगे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com