Goa: डिचोली बगलमार्गावर अवजड वाहनांचे पार्किंग

Goa: बगलमार्गावर विशेष करून राज्याबाहेरील अवजड ट्रक उभे असलेले आढळून येत आहे.
Goa: Truck Parked On Dicholi Bypass.
Goa: Truck Parked On Dicholi Bypass.Dainik Gomantak

डिचोली : शहरात पार्किंगची समस्या कायम असतानाच, आता ‘नो पार्किंग’ क्षेत्र म्हणून अधिसूचित केलेल्या शहरातील बगलमार्गावर पुन्हा वाहने, विशेषत: अवजड वाहने पार्क करण्यात येत आहेत. अधूनमधून या बगलमार्गावर विशेष करून राज्याबाहेरील अवजड ट्रक उभे असलेले आढळून येत आहे. (Parking Issue In Dicholi Goa)

एका बाजूने वाहतूक पोलिसांतर्फे डिचोली शहरातील पार्किंग समस्या नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू असतानाच, आता बगलमार्गावरील पार्किंग समस्येचे आव्हान निर्माण झाले आहे.

शहरातील कदंब बसस्थानक ते छत्रपती शिवाजी महाराज सर्कलपर्यंतच्या बगलमार्गाचे सौंदर्यीकरण पूर्ण केल्यानंतर गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात छत्रपती शिवाजी महाराज सर्कलजवळील जंक्शनवर वाहतूक सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. तत्पूर्वी हा बगलमार्ग ‘पार्किंग मार्ग’ बनला होता. बगलमार्गाच्या दुतर्फा बसगाड्या, ट्रक आदी लहानमोठी वाहने पार्क करून ठेवण्यात येत होती. गेल्या नोव्हेंबर महिन्यात उत्तर गोवा न्याय दंडाधिकारी कार्यालयातर्फे हा बगलमार्ग ‘नो पार्किंग’ झोन म्हणून अधिसूचित करण्यात आला. तेव्हापासून या बगलमार्गावरील पार्किंग समस्या बरीच नियंत्रणात आली आहे.

Goa: Truck Parked On Dicholi Bypass.
Goa: संचारबंदीतही डिचोलीत साप्ताहिक बाजार

आता पुन्हा या बगलमार्गावर पार्किंगची समस्या डोके वर काढत असल्याचे आढळून येत आहे. या बगलमार्गावर वाहने पार्क करणाऱ्यांना वेळीच आळा घालावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. दरम्यान, बेशिस्त आणि नियमबाह्य पार्किंग विरोधात कारवाई करून स्थिती पूर्ववत करण्याचे वाहतूक खात्याचे प्रयत्न असले, तरी वाहनधारकांनी शिस्त पाळणे तेवढेच गरजेचे आहे, असे संबंधित खात्याच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.विकासकामाचा आढावा सादर करा; एडविन मास्कारेन्हसचे आव्हान

Goa: Truck Parked On Dicholi Bypass.
विकासकामाचा आढावा सादर करा; एडविन मास्कारेन्हसचे आव्हान

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com