बेकायदा स्क्रॅपयार्डवाल्यांना वीज खात्याची नोटीस

बेकायदा स्क्रॅपयार्डवाल्यांना वीज खात्याची नोटीस
Goa: Illegal scrap yard dealers get notice by electricity board

फोंडा: फोंड्याला बेकायदा स्क्रॅपयार्डांचा विळखा पडला असून तालुक्‍यातील विविध ठिकाणी असलेल्या या स्क्रॅपयार्डांचा पंचनामाच पालिका तसेच पंचायतींनी करण्याची मागणी जोर धरत आहे. तालुक्‍यातील स्क्रॅपयार्डांना सरकारी यंत्रणेकडून अभय मिळत असल्याने शेवटी नागरिकांनाच अशा स्क्रॅपयार्डांची तक्रार करावी लागत आहे, त्यामुळे या स्क्रॅपयार्डवाल्यांचे साटेलोटे तपासण्याचीही मागणी केली जात आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवर कुर्टी - फोंड्यात असलेल्या दोन बेकायदेशीर स्क्रॅपयार्डवाल्यांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. 

कुर्टी - फोंड्यातील बगल रस्त्याच्या कडेला बेकायदेशीररीत्या सुरू असलेल्या दोन स्क्रॅपयार्डवाल्यांना फोंड्यातील वीज खात्याच्या सहायक अभियंत्याने नोटिस पाठवली आहे. सामाजिक कार्यकर्त्यांकडून या स्क्रॅपयार्डांबाबतची तक्रार आल्यानंतरच अशी नोटिस गेली आहे. त्यात कुर्टी बगल रस्त्यावरील आमिर खान नामक इसमाचे स्क्रॅपयार्ड व दुसऱ्या इमाम हुसेन व अल्लाबक्ष खान या दोघांच्या स्क्रॅपयार्डला बेकायदेशीरपणे वीज कनेक्‍शन घेतल्याप्रकरणी ही नोटीस बजावली आहे.

संपादन: ओंकार जोशी

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com