Goa: चतुर्थीच्या तोंडावर पावसाचा कहर

डिचोली बाजारावर पावसाचा परिणाम (Goa)
Goa: चतुर्थीच्या तोंडावर पावसाचा कहर
Bicholim Pre - Chaturthi Market (Goa)Dainik Gomantak

Goa: ऐन चतुर्थीच्या (Ganesh Chaturthi) तोंडावर पावसाने कहर केल्याने यंदा चतुर्थीच्या बाजारावर परिणाम होण्याची शक्यता वाढली आहे. हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार पावसाचा कहर चालूच राहिल्यास यंदा बाजार थंडावण्याची शक्यता डिचोलीतील व्यापाऱ्यांकडून व्यक्त होत आहे (Traders in Bicholim worried). विक्रेत्यांसह गणेशभक्तांच्या (Ganesh Devotee) चेहऱ्यावर निरुत्साह दिसून येत आहे. मागील दोन-तीन दिवसांपासून पर्जन्यवृष्टी (Rain Issues) चालू असून, आज (शनिवारी) तर पावसाचा जोर वाढला होता. सकाळी आणि दुपारी काहीवेळ वगळता दिवसभर पावसाची संततधार चालूच होती. पावसामुळे चतुर्थीच्या बाजारावर परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले. (Impact on Chaturthi market due to rains)

Bicholim Pre - Chaturthi Market (Goa)
Goa: डिचोली लायन्स क्लबतर्फे सफाई कामगारांना चतुर्थीची भेट

आधीच कोविड महामारीमुळे बाजारावर मर्यादा आल्या आहेत. त्यातच आता पावसाचे संकट उभे ठाकले आहे. चतुर्थीच्या बाजारपेठा फुलत असतानाच पावसाचा कहर केल्याने चतुर्थीच्या खरेदीवर परिणाम झाला आहे. चतुर्थीचे साहित्य विकणाऱ्या व्यापाऱ्यांना ग्राहकांची प्रतीक्षा आहे. पावसाची संततधार कायम राहिल्यास यंदा धंद्याला मार बसणार. अशी भिती बाजारातील व्यापाऱ्यांकडून व्यक्त होतं आहे. धड चतुर्थीची बाजारहाट करायला मिळत नसल्यामुळे गणेशभक्तांचीही चिंता वाढली आहे. त्यांच्या चेहऱ्यावर निरुत्साह दिसून येत आहे. मंगलमूर्ती गणराया कृपा करा, आणि एकदा पावसाचे विघ्न दूर करा. अशी साकडे वजा विनंती गणेशभक्त करीत आहेत. पाऊस चालूच राहिल्यास यंदा चवथीच्या बाजारावर मोठा परिणाम होणार असून, त्याचा फटका विक्रेत्यांना बसणार आहे. गणेशभक्तांच्याही उत्साहावर विरजण पडणार. असे बाजारातील मिठाई विक्रेते महेश येंडे यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com