Goa: अखिल भारतीय मानांकन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत डॉ. सतीशने मारली बाजी

मास्टर्स बॅडमिंटन (Badminton)उपांत्य फेरी गाठलेल्या तानाजी, सिक्लेटिका यांची जागतिक स्पर्धेस पात्रता.
Goa: अखिल भारतीय मानांकन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत डॉ. सतीशने मारली बाजी
डॉ. सतीशDainik Gomantak

पणजी: तंदुरुस्तीचे उत्कृष्ट उदाहरण असलेल्या गोव्याच्या डॉ. सतीश कुडचडकर याने आपल्या कामगिरीचा धडाका कायम राखला आहे. अखिल भारतीय मानांकन मास्टर्स बॅडमिंटन(All India Rankings Masters Badminton) स्पर्धेत सतीशने सोमवारी 75+ वयोगटातील पुरुष एकेरीत अंतिम फेरी गाठली. स्पर्धा नावेली येथील मनोहर पर्रीकर इनडोअर स्टेडियममध्ये पार पडली.

डॉ. सतीश यांनी आता स्पेनमध्ये(Spain) होणाऱ्या BWF जागतिक मास्टर्स स्पर्धेसाठी पात्रता मिळाली आहे. याव्यतिरिक्त गोव्याच्या आणखी दोघा खेळाडूंनी जागतिक मास्टर्स स्पर्धेसाठी भारतीय संघातील स्थान सोमवारी पक्के केले आहे. पुरुषांच्या 65+ वयोगटातील एकेरीत उपांत्यपूर्व लढत जिंकत गोव्याच्या तानाजी सावंत याने उपांत्य फेरीत जागा मिळविली. तर सिक्लेटिका रिबेलो हिनेही जागतिक स्पर्धेसाठी पात्रता मिळविली आहे, मात्र तिचे आव्हान 75+ वयोगटातील महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत संपुष्टात आले.

डॉ. सतीश
गोव्याच्या बॅडमिंटनपटूंची अखिल भारतीय मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत चमकदार कामगिरी

डॉ. सतीशने (Satish)शानदार खेळी करून मोहन श्रीवास्तव याच्यावर मात केली. तानाजी याने आपल्या वयोगटात लक्ष्मणभाई चावडा (chavada)याचा पराभव करत उपांत्य फेरीत पोहचली. ओल्गा डिकॉस्ता हिच्याकडून हार पत्करल्यामुळे सिक्लेटिका हिची अंतिम फेरी हुकली.

गोव्याच्या अन्य खेळाडूंत मिश्र दुहेरीतील 65+ वयोगटात काशिनाथ जल्मी आणि पर्पेच्युआ जॅकिस यांचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवता आले नाही. पुरुषांच्या याच वयोगटातील दुहेरीत प्रदीप (pradip)धोंड व तानाजी सावंत (tanaji )जोडीस उपांत्यपूर्व फेरी पुढे जात आले नाही.

डॉ. सतीश
Olympics Awareness Programme: मिरामारला रंगला बॅडमिंटन महोत्सव

गोव्यातील खेळाडूंचे निकाल(Result):

पुरुष 75+ वयोगट एकेरी उपांत्य फेरी: डॉ. सतीश कुडचडकर वि. वि. मोहन श्रीवास्तव 21-19, 21-15.

पुरुष 65+ वयोगट एकेरी उपांत्यपूर्व फेरी: तानाजी सावंत वि. वि. लक्ष्मणभाई चावडा 21-13, 21-18.

महिला 75+ वयोगट एकेरी उपांत्य फेरी: सिक्लेटिका रिबेलो पराभूत वि. ओल्गा डिकॉस्ता 6-21, 9-21.

मिश्र दुहेरी 65+ वयोगट उपांत्यपूर्व फेरी: काशिनाथ जल्मी व पर्पेच्युआ जॅकिस पराभूत वि. व्ही. व्यंकटचलय्या व भाग्यलक्ष्मी 10-21, 16-21.

पुरुष दुहेरी 65+ वयोगट उपांत्यपूर्व फेरी : प्रदीप धोंड व तानाजी सावंत पराभूत वि. एम. एस. पुत्तराज व जयंत शेट्टी 18-21, 18-21.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com