Goa: गायन स्पर्धेत गोव्याचा हृषीकेश ढवळीकर द्वितीय तर आर्याला तृतीय पुरस्कार

ऑनलाईन पद्धतीने झालेल्या स्पर्धेत जगातील अनेक युवा गायकांचा सहभाग (Goa)
Hrishikesh Dhavalikar (2nd Rank in Singing Competition) Goa.
Hrishikesh Dhavalikar (2nd Rank in Singing Competition) Goa.Manguesh Borkar / Dainik Gomantak

फातोर्डा: पंडित रामाश्रय झा 'रामरंग' समितीने आयोजित केलेल्या पं. रामरंग रचित आंतरराष्ट्रीय बंदिश गायन 2021 स्पर्धेत (International Bandish Singing Competition 2021) गोव्याच्या (Goa) हृषीकेश नितीन ढवळीकर यास 15 वर्षाखालील गटात द्वितिय क्रमांक तर याच गटात आर्या दुर्गेश्र्वर अभिषेकी हिस तृतिय पुरस्कार प्राप्त झाला. प्रथम पुरस्कारासाठी पुणेच्या (Pune) देविका अभिजीत अंकुलगे हिची निवड झाली. ऑनलाईन पद्धतीने 11 ऑगस्ट रोजी झालेल्या या स्पर्धेत (Online Competition) जगातील अनेक युवा गायकांनी (Young Singing Talents) भाग घेतला होता. ही स्पर्धा रामरंग जयंती संगीत समारोहच्या निमित्ताने आयोजित करण्यात आली होती.

Hrishikesh Dhavalikar (2nd Rank in Singing Competition) Goa.
गोव्यात डेंग्यू वाढल्याने खाटांची कमतरता

हृषीकेश व आर्या ही दोघेही फोंडा येथील अभिनव कला मंदिरामध्ये शिकत असुन त्याना नितीन ढवळीकर व मुग्धा गावकर यांच्याकडुन मार्गदर्शन मिळाले. या दोघांना अनुराग देसाई व अनय घाटे यांनी हार्मोनियमवर तर शशांक उपाध्ये याने तबल्यावर साथ दिली. या समारोहात स्पर्धेदरम्यान अनेक दिग्गज कलाकार उपस्थित होते. यात पंडित सत्यशील देशपांडे, सतारवादक प्रो. साहित्य कुमार नहार, प्रो. स्वतंत्रा शर्मा, तसेच रामरंग समितीच्या सल्लागार विदुशी शुभा मुदगल तसेच निमंत्रक डॉ. रामशंकर यांचा समावेश होता.

Hrishikesh Dhavalikar (2nd Rank in Singing Competition) Goa.
Goa: भाऊसाहेब बांदोडकर हे अनाथांचे आधारस्थंभ

परीक्षक म्हणुन डॉ. राजेश केळकर, डॉ. स्नेहाशीश दास व डॉ. जोईता बोस मंडल यांनी काम पाहिले. अभिनव कला मंदिरातर्फे या दोघांचे अभिनंदन करण्यात आले. या दोघांना एवढ्या मोठ्या गायन स्पर्धेत बक्षिसे मिळाली ही अभिमानाची गोष्ट असल्याचे नितीन ढवळीकर यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com