Goa: श्री शांतादुर्गा सांस्कृतिक आणि क्रीडा संघाच्या घुमट आरती मंडळाचे उद्घाटन

श्री शांतादुर्गा सांस्कृतिक आणि क्रीडा संघाच्या घुमट आरती मंडळाचे स्थानिक सरपंच संजय तुळसकर यांच्याहस्ते करण्यात आले.
Goa: श्री शांतादुर्गा सांस्कृतिक आणि क्रीडा संघाच्या घुमट आरती मंडळाचे उद्घाटन
घुमट आरती मंडळाने आपली कला सादर केली.Dainik Gomantak

मोरजी: वारखंड येथील श्री शांतादुर्गा सांस्कृतिक आणि क्रीडा संघाच्या घुमट आरती मंडळाचे स्थानिक सरपंच संजय तुळसकर यांच्याहस्ते करण्यात आले.

या वेळी व्यासपीठावर माजी सरपंच मंदार परब, संस्थेचे अध्यक्ष विजय परब, देवस्थान अध्यक्ष हनुमंत परब, सदस्य मुकुंद परब, ज्ञानेश्वर परब, कुलदीप परब, घुमट आरती प्रशिक्षक भाग्यवान परब आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन स्वप्नील सावंत यांनी तर आर्चित परब यांनी आभार प्रदर्शन केले.

घुमट आरती मंडळाने आपली कला सादर केली.
Ganesh Chaturthi Special Recipe: करा बाप्पांच्या आवडीचा हा खास नैवेद्य

यावेळी घुमट आरती मंडळाने आपली कला सादर केली. सरपंच संजय तुळसकर यांनी बोलताना पारंपारिक कला जोपासताना युवकांनी आधुनिक तंत्रज्ञाचा वापर करून प्रगती साधावी असे आवाहन केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष विजय परब यांनी मनोगत व्यक्त केले

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com