गोवा ‘माहिती आयोगा’चे कामकाज ठप्प

दैनिक गोमन्तक
मंगळवार, 5 जानेवारी 2021

गोवा माहिती आयोग कार्यालयातील असलेली आयुक्तांची तिन्हे पदे रिक्त असल्याने तेथील कामकाज ठप्प झाले आहे.

पणजी : गोवा माहिती आयोग कार्यालयातील असलेली आयुक्तांची तिन्हे पदे रिक्त असल्याने तेथील कामकाज ठप्प झाले आहे. ही पदे भरण्यासाठी सरकारने अर्ज मागविले असून ५४ जणांनी त्यासाठी इच्छुक आहेत. या निवडीसाठीची पहिली बैठक आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यामुळे सध्या या आयोगाच्या कार्यालयातील सुनावणी बंद आहे. 

माहिती हक्क कायद्याखाली सरकारी खात्यातून माहिती देण्यास उशीर झाल्यास किंवा दिलेली माहिती असमाधानकारक असल्यास त्याला आयोगाकडे आव्हान देण्यात येते. त्यामुळे सामान्य लोकांना हे माहिती आयोग कार्यालय महत्त्‍वाचे आहे. 

गेल्यावर्षी माहिती आयोगाच्या कार्यालयातील मुख्य माहिती आयुक्त व माहिती आयुक्त निवृत्त झाले होते. गेल्यावर्षीच्या डिसेंबरपर्यंत माहिती आयुक्त प्रतिमा वेर्णेकर यांचा कार्यकाळ संपल्याने आता सर्व पदे रिक्त झाली आहे. ही तिन्ही पदे भरण्यासाठी सरकारने गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात निवड प्रक्रिया सुरू केली होती. मात्र, अजून ती पूर्ण झाली नाही. या निवड समितीची पहिलीच बैठक आज झाली. ही रिक्त पदे भरण्यासाठी सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत.

या तिन्ही माहिती आयोग पदासाठी विविध क्षेत्रातील व्यक्तींनी अर्ज केले आहेत त्यामध्ये राजकारणी, माजी सरकारी राजपत्रित तसेच इतर अधिकारी, पत्रकार, वकील याचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार काही अर्जदारांमध्ये या पदासाठी चढाओढ सुरू झाली आहे. ही पदे घटनात्मक आहेत. त्यामुळे ॲडव्होकेट जनरलांच्या सल्ल्याने ही समिती पुढील पावले उचलत आहेत. या पदावर राजकारणातील व्यक्तींची निवड होऊ नये, अशी काही वकिलांचे मत आहे. 

संबंधित बातम्या