Goa: कंटेनर सेवा पूर्ववत करण्यासाठी पायाभूत सुविधा आवश्यक

Goa: बैठकीत मत व्यक्त ः जहाज चालकांबरोबर विविध विषयांवर चर्चा
Goa: Container Ship
Goa: Container ShipDainik Gomantk

वास्को, ता. ९ (प्रतिनिधी) ः जहाज चालकांनी (Ship owner) पुन्हा काम सुरू करण्यासाठी त्यांना एमपीटीकडून (MPT) जहाज हाताळण्यासाठी पायाभूत सुविधा (Infrastructure) मिळायला हव्यात. कंटेनर (Container) सेवा सुरू करण्यासाठी आवश्यक बाबींची पूर्तता करण्याची गरज बैठकीत व्यक्त करण्यात आली. ही बैठक तीन तासांपेक्षा जास्त काळ चालली. एमपीटीत कंटेनर सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी व्यवसायाचे भागधारक, गोव्यातील उद्योग संघटनांचे प्रतिनिधी, उत्पादक आणि निर्यातदार यांची सोमवारी (Monday)सकाळी जहाज चालकांबरोबर संयुक्त बैठक झाली.

Goa: Container Ship
Tourism in Goa: आम्हाला वाटते पर्यटन सुरु व्हावे पण...

शिपिंग आणि लॉजिस्टिक एजंट राकेश उन्नी यांनी ही संयुक्त बैठक घेण्यासाठी पुढाकार घेतला. ते म्हणाले की, जहाज ऑपरेटर जहाज सेवा गोव्यात करण्यास इच्छुक आहेत. एमपीटी कंटेनर हाताळण्यासाठी पायाभूत सुविधा वाढवण्याची मागणी केली आहे. एमपीटीने गोव्यामध्ये कंटेनर ऑपरेशन्स सुरू करण्यास इच्छुक असलेल्या ऑपरेटर्संना आधीच चांगल्या सवलती दिल्या आहेत. एमपीटीने आम्हाला असेही सूचित केले आहे की, ते इतर काही बंदरांमधून क्रेन घेण्यास इच्छुक आहेत आणि क्रेन सेवा देण्यासाठी अनुकूल मत व्यक्त केले आहे. एमपीटीत पायाभूत सुविधांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे सवलतींबरोबर पायाभूत सुविधाच हा प्रश्न सुटू शकतो, असे उन्नी यांनी सांगितले. सर्व भागधारकांनी पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले आहे. गोव्यात कंटेनरचे प्रमाण प्रचंड आहे. परंतु त्यातील बहुतांश रस्तामार्गे हाताळले जातात. काहीवेळेला जेएनपीटी बंदर मुंबईतून रिकामे कंटेनर येतात आणि लोड केल्यानंतर परत पाठवले जातात आणि हा सुमारे १३०० किलोमीटरचा रस्ता आहे. हे सर्व प्रदूषणाला आमंत्रित करणारे आहे, असे उन्नी यांनी स्पष्ट केले.

सामूहिक प्रयत्नांची गरज
गोवा बार्ज ओनर्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष अतुल जाधव म्हणाले की, सर्व भागधारक, कस्टम हाऊस एजंट इत्यादी उद्योगांशी संबंधित सर्व संघटना एकत्र आल्या आहेत. त्यांनी जहाज ऑपरेटरला बोलावले आणि जहाज ऑपरेटरच्या गरजांवर चर्चा केली. एकच मुद्दा असा आहे की, जहाज ऑपरेटर आठवड्यात १००० कंटेनर अपेक्षित आहेत. परंतु आम्ही त्यांना सांगितले की, हा आकडा आपल्याला लगेच गाठता येणार नाही. पण सकारात्मक प्रतिसादातून येथे एक चांगले ठिकाण तयार होऊ शकते. आम्ही सरकारला जहाज मालकांना अनुकूल परिस्थिती निर्माण करण्यास मदत करण्याची विनंती करू, असे जाधव यांनी सांगितले. एक निर्यातदार अरमान बँकले यांनी सांगितले की, कंटेनर सेवा पुन्हा सुरू न झाल्यास आमच्या समस्यात वाढ होऊ शकते. आता ही सेवा पूर्ववत होण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com