Goa: दीड वर्षापूर्वीच्या भुयारांची आज पाहणी

लोकांकडून आश्‍चर्य: पुरातत्त्व खात्याचा ‘बैल गेला अन्‌ झोपा केला’
Goa: दीड वर्षापूर्वीच्या भुयारांची आज पाहणी
भुयारDainik Gomantak

पेडणे: मोपा येथील नियोजित विमानतळाच्या परिसरात व धावपट्टीवर दीड वर्षांपूर्वी सापडलेली भुयारे ‘दै. गोमन्तक’मध्ये बातम्या प्रसिद्ध होताच घाईगडबडीने मोठमोठे दगड व माती घालून बुजवण्यात आली. आता या भुयारांच्या जागा शोधून काढणे अशक्य असून, पुरातत्त्व खात्याचे अधिकारी 6 रोजी त्याची पाहणी करण्यासाठी येणार आहेत. खात्याची ही पाहणी म्हणजे ‘बैल गेला अन्‌ झोपा केला’ असा प्रकार असल्याची चर्चा सुरू आहे.

भुयार
पेडणे शहरात वाहतुकीची कोंडी

मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे बांधकाम सुरू असताना व सपाटीकरण करताना डिसेंबर 2020 ते जानेवारी 2021 या दरम्यान तीन बाजूंनी तसेच विमानतळाच्या मध्यवर्ती भागात मोठी भुयारे सापडली होती. त्यांचा आकारही बराच मोठा होता. त्यातून चालत जाणे सहज शक्य होते. गोमन्तकने यासंदर्भात दोन वेळा छायाचित्रांसह बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या. बातम्या प्रसिद्ध झाल्यावर लगेच विमानतळाचे बांधकाम करणाऱ्या कंत्राटदाराने दगड व मातीचा भराव घालून ही भुयारे बुजवून टाकली होती. मात्र त्यावेळी निद्रिस्त राहिलेलेले पुरातत्त्व खाते चक्क दीड वर्ष उलटून गेले असताना या भुयारांचा आता शोध घेण्यासाठी येत आहे, याबद्दल लोकांमध्ये आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.