53rd IFFI 2022: गोमंतकीय सिनेकर्मींसाठी विशेष मास्टर क्लास- शोभा संत

53rd IFFI 2022: उत्तम सिनेमाच्या निर्मितीसाठी लेखकाने लिहिलेली पटकथा शंभर वेळा वाचावी.
53rd IFFI 2022 | Shobha Sant
53rd IFFI 2022 | Shobha SantDainik Gomantak

53rd IFFI 2022: कोणत्याही सिनेनिर्मात्याकडे किंवा निर्मिती संस्थेकडे आपली पटकथा पाठवण्यापूर्वी लेखकाने ती किमान 100 वेळा वाचली पाहिजे. तसेच त्यातील उणीवा सतत शोधत राहून प्रत्येकवेळी नव्याने पटकथा लिहिली पाहिजे. असे झाले तरच उत्तम सिनेमाची निर्मिती होऊ शकते, असे प्रतिपादन जीओ स्टुडिओच्या प्रमुख शोभा संत यांनी केले.

इफ्फीच्या निमित्ताने गोमंतकीय सिनेकर्मीसाठी आयोजित विशेष मास्टर क्लासमध्ये शोभा संत बोलत होत्या. पटकथा लिहिल्यानंतर त्यावर पहिल्याच ड्राफ्टवरती सिनेमाची निर्मिती व्हावी असे अनेक लेखक, दिग्दर्शकांना वाटत असते. वास्तविक पहिला ड्राफ्ट हा सर्वार्थाने कच्चा मसुदा असतो. पण अनेक उत्साही लेखक, दिग्दर्शकांना याचे भान नसते. त्यामुळे त्यांच्या पटकथा विविध निर्मात्याकडून किंवा निर्मितीसंस्थाकडून बेदखल होतात, असे त्‍या म्‍हणाल्‍या.

अशा प्रकारामुळे अनेक लेखक, दिग्दर्शकांचा हिरमोड होतो. पण सिनेमाही जेवढी कलात्मक गोष्ट आहे तेवढीच किंबहुना त्याहून जास्त अधिक आर्थिक बाब आहे. त्यामुळे तुमच्या कथेवर पैसा लावण्यापूर्वी ती कथा उत्तमच झाली पाहिजे. यासाठी लेखक, दिग्दर्शकांनी प्रयत्न केला पाहिजे, असेही संत यांनी नमूद केले.

53rd IFFI 2022 | Shobha Sant
53rd IFFI 2022: यंदा इफ्‍फीला अभूतपूर्व प्रतिसाद लाभतोय- रवींद्र भाकर

चित्रपटाच्या कथेचा मूळ गाभा महत्वाचा

सिनेमाच्या सुरवातीला काळापासूनच गाजलेल्या साहित्यकृतीवर जगभरात विविध सिनेमांची निर्मिती आवर्जून होत आहे. कित्येकदा एकाच पुस्तकावर आधारित वेगवेगळ्या कलाकृती वेगवेगळ्या काळामध्ये सादर होतात. असे असले तरी सदर कलाकृतीला समान प्रमाणात प्रतिसाद मिळतोच असं नाही.

यामध्ये कित्येकदा असे असते की संबंधित माध्यमांतरात कथेचा मूळ आत्मा म्हणजे संबंधित साहित्य कृतीमध्ये असलेले एकूण गोष्टीचे तत्त्वज्ञान गहाळ होत जाते आणि सिनेमा ‘दाखवण्या’वरती सिनेकर्मी अधिक भर देतात. कथेचे तत्त्वज्ञान कुठल्याही माध्यमांतरामध्ये तितकेच जोपासले पाहिजे, असे प्रसिद्ध लेखक अर्जुन राज यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com