गोवा ‘भारनियमनमुक्त’ एकमेव राज्‍य

वीजमंत्री ढवळीकर: 32 कोटी खर्चून डिचोलीत भूमिगत वीजवाहिन्या
गोवा ‘भारनियमनमुक्त’ एकमेव राज्‍य
Sudin DhavalikarDainik Gomantak

डिचोली: राज्‍यात विजेची समस्‍या गंभीर नाही. गोवा हे ‘भारनियमनमुक्त’ (लोडशेडिंग) एकमेव राज्य आहे, असे वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी सांगितले. 32 कोटी रुपये खर्चून डिचोलीत भूमिगत वीजवाहिन्या घालण्‍यात येणार असल्याची माहितीही त्‍यांनी दिली.

डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये आणि मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यांच्या उपस्थितीत दोन्ही मतदारसंघांतील वीज खात्याशी संबंधित कामांचा आढावा घेतल्यानंतर ढवळीकर यांनी ही माहिती दिली.

Sudin Dhavalikar
देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्याला थारा आहे का: एन. राम

येथील हिराबाई झांट्ये सभागृहात आयोजित बैठकीला वीज खात्याचे मुख्य अभियंता स्टीफन फर्नांडिस, मुख्य कार्यकारी अभियंता वल्लभ सामंत, साहाय्यक अभियंता नीळकंठ सावंत, तसेच नगराध्यक्ष कुंदन फळारी, नगरसेवक विजयकुमार नाटेकर, गुंजन कोरगावकर, ॲड. रंजना वायंगणकर आणि दीपा पळ, चोडणचे सरपंच कमलाकांत वाडयेकर, उपस्थिती होते.

डिचोली वीजकेंद्राला क्रेनची भासतेय गरज

डिचोली वीजकेंद्रात आवश्यक सुविधा पुरविण्याची मागणी आमदार डॉ. शेट्ये यांनी केली. वीजकेंद्राला क्रेनची गरज असल्याचे त्यांनी मंत्री ढवळीकर यांच्या निदर्शनास आणून दिले. वीजपुरवठ्यासंदर्भात स्थानिक पातळीवरून आवश्यक सहकार्य देण्याची ग्वाही आमदार प्रेमेंद्र शेट यांनी देताना जनतेला सुरळीत वीजपुरवठा देण्यासाठी तत्पर रहा, असे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. वीजमंत्र्यांनी उपस्थितांकडून गाऱ्हाणी ऐकून घेतली. यावेळी विजयकुमार नाटेकर, ॲड. रंजना वायंगणकर, दीपा पळ, गुंजन कोरगावकर, बबनराव राणे, दिलीप धारगळकर आदींनी मोडकळीस आलेले वीजखांब, खंडित वीजपुरवठा आदी समस्या मांडल्या. वीज खात्याचे मुख्य अभियंता फर्नांडिस यांनी आभार मानले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.