Goa: ३४ टक्के लोकांना लसीचा दुसरा डोस

पहिल्या डोसचे १०० टक्के लक्ष्य पूर्ण करणारे गोवा हे हिमाचल प्रदेशनंतर दुसरे राज्य ठरले आहे.
Goa: ३४ टक्के लोकांना लसीचा दुसरा डोस
vaccinationDainik Gomantak

पणजी : राज्यातील १८ वर्षांवरील लोकसंख्येचा विचार करता शंभर टक्के लोकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे. यापैकी ३४ टक्के लोकांनी दुसरा डोस घेतला आहे. राज्यातील १८ वर्षांवरील सर्व लोकांना ३१ ऑक्टोबरपर्यंत दुसरा डोसही (vaccination) देण्याचे लक्ष सरकारने ठेवले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांनी दिली. पहिल्या डोसचे १०० टक्के लक्ष्य पूर्ण करणारे गोवा हे हिमाचल प्रदेशनंतर दुसरे राज्य ठरले आहे.

vaccination
Goa: नोकऱ्या देताना जुन्या कंत्राटी कर्मचाऱ्यांवर अन्याय करू नका; खासदार 'फ्रान्सिस सार्दीन'

काणकोणात वाढली कोरोनाबाधितांची संख्‍या

काणकोणात गेल्या दोन आठवड्यांपासून कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. आज १४ रुग्‍ण सापडले. त्‍यामुळे एकूण सक्रिय रुग्‍णांची संख्या ९४ वर पोचली आहे. गेल्या आठवड्यात लोलये पंचायत क्षेत्रात मोठ्या संख्‍येने रुग्‍ण सापडले होते. आज पैंगीण पंचायत क्षेत्रात आठ, लोलये पंचायत क्षेत्रात चार तर पालिका क्षेत्रात दोन रूग्ण सापडले. आतापर्यंत काणकोणात ३५८८ लोकांना कोरोनाची लागण झाली असून ३४६१ बाधित बरे झाले आहेत.

दरम्‍यान, दक्षिणेकडून पोळे तपासणी नाका ओलांडून राज्यात प्रवेश करणाऱ्या नागरिकांना लसीकरण दाखला बघूनच राज्यात प्रवेश दिला जात आहे. दोन लस घेतलेल्‍यांना सरळ प्रवेश देण्यात येत आहे. ज्याच्याकडे असे दाखले नाहीत त्यांची तपासणी नाक्यावर अँटीजेन चाचणी केली जातेय.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com