Goa Ivermectin scam: कोण खरा, कोण खोटा? ‘आरटीआय’तून पर्दाफाश

Goa Ivermectin scam
Goa Ivermectin scam

पणजी: Goa Ivermectin scam सरकारने प्रोफेलिक्सिस उपचारासाठी आयव्हर्मेक्टिन(Ivermectin Tablet) गोळ्यांची खरेदी खासगी औषधे पुरवठादारांकडून दामदुप्पट किमतीने केली आहे. गोवा(Goa) अँटिबायोटिक्स फार्मास्युटिकल्स लि.ने (जीएपीएल) आयव्हर्मेक्टिन गोळीची किंमत 2.79 रुपये नमूद केली असताना इतर चार खासगी औषध पुरवठादारांनी तीच गोळी 10 ते 12 पटीने जास्त किमतीने सरकारला(Government) विकल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. ‘गोमन्तक’ने माहिती हक्क कायद्याखाली (आरटीआय) ही माहिती मिळवली आहे. त्यामुळे आयव्हर्मेक्टिन गोळ्यांच्या खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचे स्पष्ट होत असून, ही रक्कम दीड कोटींंच्या आसपास असू शकते.(Goa Ivermectin scam Corruption of Goa government in procurement of ivermectin tablets)

गोळ्यांचा पुरवठा करण्याचा आदेश दिला होता 

माहिती हक्क कायद्याखाली मिळालेल्या माहितीनुसार, राज्य सरकारने आयव्हर्मेक्टिन गोळ्यांच्या पुरवठ्यासाठी औषध पुरवठाधारकांकडून निविदा मागविल्या होत्या. त्यातून हेदे एंटरप्राईज, गोवा अँटिबायोटिक्स, रायकर डिस्ट्रिब्युटर्स या तिघांच्या निविदा सरकारने स्वीकारल्या होत्या. रायकर डिस्ट्रिब्युटर्सच्या तीन निविदा स्वीकारण्यात आल्या. त्यातील प्रतिगोळ्यांच्या किमती वेगवेगळ्या नमूद करण्यात आलेल्या होत्या. सरकारने गोवा अँटिबायोटिक्सला गेल्या 30 एप्रिलला 1 लाख आयव्हर्मेक्टिन गोळ्यांचा पुरवठा करण्याचा आदेश दिला होता. या आदेशात प्रत्येक गोळीची किंमत 2.27 रुपये नमूद करण्यात आली होती. त्यामुळे एकूण किंमत 2 लाख 79 हजार होते. 

आयव्हर्मेक्टिन गोळ्यांच्या किमतीत बराच फरक

1 मे 2021 रोजी हेदे एंटरप्रायझेसला आयव्हर्मेक्टिनच्या एक लाख गोळ्या पुरवठा करण्याचा आदेश दिला होता. त्यामध्ये प्रत्येक गोळीची किंमत 34.90 रुपये असे नमूद केल्याने एकूण रक्कम 34.90 लाख रु. होते. त्यानंतर 5 मे 2021 रोजी रायकर डिस्ट्रिब्युटर्सला प्रत्येकी एक लाख गोळ्यांचा पुरवठा करण्याचे दोन वेगवेगळे आदेश सरकारने दिले होते. हे दोन्ही आदेश एकाच दिवशी देण्यात आले, तरी प्रत्येक गोळीची किंमत आदेशात 24.75 रुपये व 22.10 रुपये दर्शविण्यात आली होती. या दोन लाख गोळ्यांची किंमत अनुक्रमे 24.75 लाख व 22.10 लाख रुपये होते. त्यानंतर पुन्हा रायकर डिस्ट्रिब्युटर्सला 15 मे 2021 रोजी 4 लाखांच्या गोळ्यांचा पुरवठा करण्याचा आदेश देण्यात आला होता. त्यामध्ये प्रत्येक गोळीची किंमत 22.10 रुपये दर्शविण्यात आली होती. त्याची एकूण किंमत सुमारे 99 लाख होते. खासगी पुरवठादारांकडून सरकारने खरेदी केलेल्या आयव्हर्मेक्टिन गोळ्यांच्या किमतीत बराच फरक दिसून येत आहे. 

कोण खरा, कोण खोटा?

राज्यात प्रोफेलिक्सिस उपचाराखाली आयव्हर्मेक्टिन गोळ्या कोरोना प्रतिबंधक म्हणून 18 वर्षांवरील व्यक्तींना देण्यासाठीची परवानगी व आदेश मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिला असल्याचे आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी 10 मे रोजी सांगितले होते. सरकारने प्रोफेलिक्सिस उपचाराखाली आयव्हर्मेक्टिन गोळ्यांचे वितरण करण्यासाठी त्या खरेदी करण्यात आल्या नव्हत्या. ‘आयसीएमआर’ने मान्यता दिल्यानंतरच या गोळ्या कोरोना संसर्ग झालेल्या व गृह अलगीकरणातील रुग्णांना ‘होम आयसोलेशन’ किट सोबत देण्यात आल्या होत्या, असे मुख्यमंत्री सावंत यांनी 9 जून रोजी स्पष्ट केले होते. त्यामुळे आरोग्यमंत्री व मुख्यमंत्र्यांनी आयव्हर्मेक्टिन गोळ्यांच्या खरेदी व वाटपासंदर्भात केलेली वक्तव्ये परस्परविरोधी आहेत. त्यामुळे खरे-खोटे कोण हे जनतेनेच ठरवायचे आहे. 
 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com